shivaji-kardile
shivaji-kardile 
नगर

राजकीय उद्देशाने दादा पाटलांचे नाव दिलेले नाही : कर्डिले

सरकारनामा ब्युरो

नगर : कोणत्याही राजकीय उद्देशाने बाजार समितीला (स्व.) दादा पाटलांचे नाव दिलेले नाही. त्यांनी केलेली विकासकामे मोठी आहेत. तालुक्‍यात आमचा नेहमीच संघर्ष राहिला मात्र, विकासात आम्ही नेहमीच एकमेकांची साथ दिली, असे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला दिवंगत माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नाव देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला. आज आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत बाजार समितीचे नामांतर झाले. या वेळी आमदार अरुण जगताप, रावसाहेब शेळके, प्रताप शेळके आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना पवार म्हणाले, संघर्ष टाळल्यास गाव, तालुका, जिल्ह्याचा विकास होतो. हिवरेबाजारच्या विकासात तालुक्‍यातील प्रत्येकाचा सहभाग असल्याने या गावच्या रूपाने नगर तालुक्‍याचे देशभर नाव झाले. 1996 पासून पक्षीय राजकारणाला पूर्णविराम देऊन पाणलोटक्षेत्रात काम सुरू केले. त्यामुळे आज हिवरेबाजारचे व नगर तालुक्‍याचे नाव देशभर आदराने घेतले जाते.  
 
आमदार अरुण जगताप यांनी दादा पाटील यांच्या कार्याचा गौरव करून 1991 साली दादा पाटलांमुळे मी या शहराचा पहिल्यांदा बिनविरोध नगराध्यक्ष झालो. दादा पाटलांकडे विकासाची दृष्टी होती. नगर तालुक्‍यात त्यांनी अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT