नगर

लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग शिवसेना शिर्डीतून फुंकणार

सरकारनामा ब्युरो

नगर : लोकसभेची तयारी म्हणून राज्यातील ४८ मतदारसंघातून होणाऱ्या सभांची सुरुवात शिवसेना रविवारी (ता. २१) शिर्डी येथून करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साईबाबांच्या साक्षीने उद्या लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. या सभेनंतर नगरला सभा होऊन राज्यातील सभांना सुरुवात होणार आहे. या सभेत नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा होणार का, याबाबत आता लक्ष लागले आहे.

नगर जिल्ह्यातील या दोन्ही सभांचे नियोजन पर्य़ावरणराज्यमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. शिर्डीत खासदार सदाशिव लोखंडे व उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी जय्यत तयारी केली आहे. तर नगर शहरात माजी आमदार अनिल राठोड, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे. पुढील दोन महिन्यांत होणारी महापालिका निवडणूक व आगामी लोकसभा-विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची तयारी सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT