नगर

`सुप्यात मते न मिळाल्याने पारनेरमधील राष्ट्रवादीच्या तथाकथित उमेदवाराकडून गुन्हे दाखल`

सरकारनामा ब्यूरो

पारनेर : लोकसभा निवडणूकीत सुपे गटात राष्ट्रवादीला आघाडी न मिळाल्यामुळे त्या पक्षाचा विधानसभेचा तथाकथीत उमेदवार आकसापोटी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडत असल्याचे युवा सेनेचे तालुका अधिकारी नितीन शेळके यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

सुपे औदयोगिक वसाहतीमध्ये कामाच्या  ठेक्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.   गेल्या पाच दिवसांत दोन्ही गटांमध्ये दोनदा संघर्ष झाला असून सुपे पोलिस ठाण्यात दोनदा परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना  शेळके यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, विविध औदयोगिक वसाहतीमध्ये आवष्यक असलेल्या सेवा पुरविण्याचे काम माइ-या नेतृत्वाखालील सदस्य गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत. सुपे येथील नव्या औदयोगिक वसाहतीमध्ये आमच्या सदस्यांकडे असलेल्या कुशल कामाच्या अनुभवामुळे त्यांना विविध कामांचा ठेका मिळाला.  स्थानिक कार्यकर्त्यांना या कामाचा ठेका मिळावा हे कारण पुढे करून काहसी तरूणांची डोकी भडकविली.  मात्र सबंधित कंपनीने आमच्या कार्यकर्त्यांना कामाचा  ठेका दिल्याची संधी साधत आमच्या पक्षाच्या विरोधकांनी त्याचा फायदा घेत आमच्या विरोधात षडयंत्र रचण्यास सुरूवात केली आहे. 

विधानसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक असलेला राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकाचे लोकसभा निवडणूकीत त्याच्या गटात राष्ट्रवादीच्या उमेदवारास आघाडी मिळाल्याने मानसिक संतुलन बिघडले आहे. त्याचा रागातून आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. जुन्या औदयोगिक वसाहतीमध्ये याच तथाकथीत संभाव्य उमेदवाराच्या कारनाम्यामुळे अनेक कंपन्या डबघाईस आल्या असून अनेक तरूण देशोधडीला लागले आहेत. नव्या औदयोगिक वसाहमीमध्ये डाळ शिजत नसल्याने आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.  वडील आजारी असल्याने आपण पुण्यामध्ये असताना माझे नाव फिर्यादीमध्ये नोंदविण्यात आल्याचा दावा शेळके यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT