shrirampur panchayat samiti
shrirampur panchayat samiti 
नगर

राधाकृष्ण विखेंचा थोरात- ससाणे गटाला धक्का

सुनील नवले

श्रीरामपूर (नगर) : पंचायत समितीच्या सभापतीपदी संगीता शिंदे, तर उपसभापतीपदी बाळासाहेब तोरणे यांची आज निवड झाली. काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार स्व. जयंत ससाणे गटाला माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार धक्का दिला. 

विखे यांना माजी आमदार भनुदास मुरकुटे यांनी मदत केली. ससाणे गटाच्या शिंदे या माजी मंत्री राधाकृष्ण विखे गटाला मिळाल्याने त्यांची सभापती पदावर वर्णी लागली. 

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. तहसीलदार प्रशांत पाटील व गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी त्यांना सहकार्य केले. 

सभापतीपदासाठी ससाणे गटाच्या डॉ. वंदना मुरकुटे व संगिता शिंदे यांनी, तर उपसभापतीपदासाठी मुरकुटे गटाचे तोरणे व ससाणे गटाचे विजय शिंदे यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते. निवडणुकीत हात वर करून मतदान घेण्यात आले. त्यात सभापतीपसाठी शिंदे व उपसभापतीपदासाठी तोरणे यांना पाच मते मिळाली. तर मुरकुटे व विजय शिंदे यांना तीन मते मिळीली. प्रांताधिकारी पवार यांनी संगीता शिंदे व तोरणे यांची निवड घोषित केली. 

निवडणूकीदरम्यान मुरकुटे यांनी संगिता शिंदे यांच्या अर्जावर हरकत घेतली. आपण गटनेता असून मतदानाचा पक्षादेश (व्हीप) बजावला आहे. असे असताना शिंदे यांच्याकडून पक्षादेशाचा भंग झाला असल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करावा, असा तक्रार अर्ज त्यांनी दिला. निवडणूक निणर्य अधिकाऱ्यास त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार नसून योग्य त्या ठिकाणी दाद मागावी, असे सांगून प्रांताधिकारी पवार यांनी त्यांचा अर्ज फेटाळला. मुरकुटे व संगिता शिंदे यांनी आपणच गटनेता असल्याचा दावा करत पक्षादेश बजावला होता. 

व्हिप बजावला होता पण...
गटनेता म्हणून आपण पक्षादेश बजावला होता. शिंदे यांनी त्याचा अनादर केला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानंतर कारवाईसंदर्भात निर्णय घेणार आहोत. राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याला आपण आपल्या निवडणुकीसाठी पंचायत समितीत आणले यातच आपला विजय असल्याची प्रतिक्रिया डॉ. वंदना मुरकुटे यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT