six corona virus positive cases in one day
six corona virus positive cases in one day 
नगर

नगरचा आकडा चौदावर; परदेशी व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोघांना लागण

सरकारनामा ब्युरो

नगर: कोरोनाच्या संशयितांचे स्त्राव रोज चाचणीसाठी पाठविले जातात, जुने अहवाल येतात. हे अहवाल पाहताना मात्र प्रशासनाच्या काळजाचा ठोका चुकतो. आज कुणी पॉझिटिव्ह तर नाही ना. पण आजचा दिवस नगरकरांसाठी चिंता वाढवणारा ठरला. एकाच दिवशी तब्बल सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, नगरचा कोरोना बाधितांचा आकडा 14 व येवून ठेवला आहे.

आज जिल्ह्यातील 51 जणांचे अहवाल प्रशासनाला मिळाले. त्यामध्ये सहाजण कोरोनाचे पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये संगमनेरच्या दोघांचा व मुकुंदनगरच्या दोघांचा समावेश आहे. उर्वरीत एक इंडोनेशियातील, तर दुसऱी व्यक्ती जिबुटी येथील मूळ रहिवासी आहे. मुंकुंदनगरमध्ये सापडलेल्या दोन्ही व्यक्ती या परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात होत्या. भाषांतरकार म्हणून काम करीत होत्या. त्यातील एक मूळ राजस्थान व दुसरी मध्यप्रदेशमधील आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना धडकी भरली आहे. 

जिल्ह्यात आता चौदा कोरोनाबाधित झाले असले, तरी त्यातील एका व्यक्तिला डिस्चार्ज करण्यात आले आहे. इतर तेरापैकी आज सापडलेल्या सहा आणि यापूर्वी जामखेडमध्ये सापडलेल्या पाच जणांचा समावेश आहे. परदेशी नागरिक व त्यांच्यामुळेच नगर जिल्ह्यात बाधा झाल्याचे दिसून आले असून, त्यांच्यामुळेच आकडा हा वाढत आहे. अद्याप कोणाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही, तेवढी एक दिलासा देणारी बाब ठरली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT