Supriya Sule Took Selfie with Rahibai Popere
Supriya Sule Took Selfie with Rahibai Popere 
नगर

सुप्रिया सुळेंनाही आवरला नाही राहिबाई पोपेरे यांच्यासोबत सेल्फीचा मोह 

सरकारनामा ब्युरो

नगर : देशी बियाणे बॅंक बनविणाऱ्या राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने त्या रातोरात देशात चर्चिल्या गेल्या. सोशल मीडियावर त्यांना सर्च करण्याचे प्रमाण वाढले. रोजच कुठे ना कुठे कार्यक्रमानिमित्त गेले की त्यांच्यासोबत सेल्फी काढले जातात. आज खासदार सुप्रिया सुळे यांनाही त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

श्रीरामपूर येथे आज नगरपालिकेच्या विविध विकास कामांचा प्रारंभ, स्नेह मेळावा व पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहिबाई पोपेरे, पोपटराव पवार व जहीर खान यांच्या सत्कार समारंभ झाला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी प्रमुख उपस्थित असलेल्या खासदार सुळे यांनी राहिबाईंशी चर्चा करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्यासोबत सेल्फी घेतली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT