नगर

राम शिंदेंना विजय मिळवणे अवघड नाही: धस

सरकारनामा ब्युरो

जामखेड (नगर): "कर्जत-जामखेडमध्ये टाइट फाइट आहे, अशी चर्चा चालू आहे. ती चर्चा चालूच राहू द्या; मात्र तुमची फाइट तुम्हीच टाइट करा. इथे भाजपकडे कार्यकर्त्यांची तगडी फळी आहे. तुम्ही स्वतःला वजनदार कार्यकर्ते समजता ना; मग सगळे जिवाचे रान करा. तुम्हाला विजय मिळवणे अवघड नाही,'' असे आवाहन माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी आज कार्यकर्त्यांना केले.

साकत (ता. जामखेड) येथे भाजपचे उमेदवार मंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत धस बोलत होते. ते म्हणाले, "मंत्री शिंदे यांनी या मतदारसंघात विकासाची अनेक कामे केली. यात अमृतलिंग व भुतवडा जोडतलाव हे रखडलेले प्रकल्प पूर्ण केले. ही कामे कार्यकर्त्यांनी जनतेसमोर प्रभावीपणे मांडावीत. गावोगाव कार्यकर्त्यांनी नम्रपणे मतदारांना भेटून आपले चिन्ह समजून सांगावे. नम्रतेने मते मागावीत. इतरांची उणी-दुणी काढण्यापेक्षा आपला चांगुलपणा मतदारांपर्यंत पोचवा. आपल्यासमोरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बोलघेवडे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT