The agitating farmers of Delhi held a meeting at Shrirampur sarkarnama
नगर

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांचा श्रीरामपुरात झाला मेळावा, म्हणाले...

केंद्र सरकारच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात पंजाब ( panjab ), हरियाणा ( hariyana ) व परिसरातील शेतकऱ्यांचे ( farmer ) आंदोलन अजूनही सुरूच आहे.

गौरव साळुंके

श्रीरामपूर : केंद्र सरकारच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात पंजाब ( panjab ), हरियाणा ( haryana ) व परिसरातील शेतकऱ्यांचे ( farmer ) आंदोलन अजूनही सुरूच आहे. या आंदोलनाला देशभरातील शेतकरी व कामगार संघटनांचे समर्थन मिळत आहे. शेतकरी आंदोलनाची भूमिका देशभर पोचविण्यासाठी हे आंदोलक देशभर फिरून शेतकरी व शेतकरी नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. The agitating farmers of Delhi held a meeting in Shrirampur, said ...

विविध राज्यातील शेतकऱ्यांना संघटित करुन सुधारीत कृषी कायद्यांमधील समज गैरसमज दूर व्हावेत, यादृष्टीने श्रमिक शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. औरंगाबाद पासून राज्यव्यापी शेतकऱ्यांच्या मेळाव्याने शेतकरी संवाद यात्रेला प्रारंभ झाला. जोपर्यंत शेतकरी विरोधी तीन ही कायदे मागे घेतले जाणार नाही. तोपर्यंत आंदोलक शेतकरी माघार नाही. सरकारला माघार घ्यावीच लागेल. कॉर्पोरेट लोकांच्या घराणेशाहीला भाजपा सरकारचा पाठिंबा आहे.

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शेती जेव्हा कॉर्पोरेटच्या हातात जाईल तेव्हा अन्नधान्याचे दर देखील वाढतील. त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा राजराम सिंग यांनी दिला. केंद्रातील भाजपा सरकारच्या तीन कृषी कायदेविरोधात श्रमिक शेतकरी संघटना, सत्यशोधक शेतकरी सभा व अखिल भारतीय किसान महासभेच्या राज्यव्यापी शेतकरी संवाद यात्रेदरम्यान येथील शेतकरी मंगल कार्यालयात आयोजित मेळावा (शनिवारी) झाला.

त्यावेळी सिंग बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब सुरूडे उपस्थित होते. तर भाकपचे माजी आमदार सुदामा प्रसाद, पंजाब किसान युनियन उपाध्यक्ष सुखदर्शनसिंग नठ, आखिल भारतीय किसान महासभेचे सचिव राजाराम सिंग, राजेंद्र बावके, किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते उपस्थित होते.

मेळाव्यात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. दिल्लीत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे सुखदर्शनसिंग नठ म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था उणे 20 टक्के खाली गेली. असतानाही केवळ शेती क्षेत्रामुळे ही अर्थव्यवस्था टिकून आहे. आजही 50 टक्के पेक्षा अधिक लोकांची उपजीविका ही शेतीवर चालत आहे. शेतकरी आंदोलन केवळ पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांचे नसून संपूर्ण भारतातील शेतकरी संघटित होत आहेत.

मोदी-शहा यांच्या मर्जीने चालणारे सरकार अदानी-अंबानी करीता कृषी कायदे मागे घ्यायला तयार नाही. म्हणून कृषी कायदे लोकांना समजावून संगण्याकरिता आम्ही शेतकरी सवांद यात्रेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुदामा प्रसाद, राजेंद्र बावके, किशोर ढमाले, सुभाष काकूस्ते, शोभा मंडल यांची भाषणे झाली. तसेच आमदार लहू कानडे यांनी देखील मेळ्यास उपस्थित राहून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. जीवन सुरूडे यांनी प्रास्तविक केले. शरद संसारे यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT