Rohit Pawar
Rohit Pawar sarkarnama
नगर

रोहित पवारांच्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक, म्हणाले...

Amit Awari

अहमदनगर : जगातील सर्वात उंच ध्वज उभारणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ( NCP ) युवानेते आमदार रोहित पवार ( MLA Rohit pawar ) यांच्या संकल्पनेने लोकसहभागातून आणि सहकार्यातून ‘स्वराज्य ध्वज पूजन यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. हा 74 मीटर उंचीचा ध्वज दसऱ्याच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोंबर रोजी खर्डा येथील भुईकोट किल्ल्यावर बसविला जाणार आहे.

हा स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापने तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला (उत्तर प्रदेश), अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा 74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. त्यासाठी 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास सुरू आहे. या यात्रे निमित्त आमदार रोहित पवार देशातील मोठ्या नेत्यांना आमंत्रण देत आहेत.

या यात्रे संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रोहित पवार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी यात्रेचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण किल्ला येथे भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज- स्वराज्य ध्वज उभारण्यात येत आहे, ही आनंदाची बाब आहे. कर्जत-जामखेड मतदार संघाचे युवा आमदार रोहित पवार यांची ही संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे.

हिंदवी स्वराज्याची ओळख असणारा भगवा ध्वज हा सामर्थ्याचा, बलिदानाचे प्रतिक आहे. मराठी मातीचा अभिमान असणारा हा ध्वज युवा वर्गाला हा भगवा ध्वज प्रगती, त्यागाची प्रेरणा देईल. स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापनेपूर्वी देशातील ७४ महत्त्वाच्या धार्मिक, आध्यात्मिक स्मारके, गड किल्ले या ठिकाणी ध्वजाचे पूजन होणार आहे. या माध्यमातून देशभराचा आशिर्वाद आणि शुभेच्छा या उपक्रमाला मिळू शकणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ला येथील स्वराज्य ध्वज उभारणीस मनःपूर्वक शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

यात्रा पोचली तेरला

ही यात्रा आज संत गोरोबा कुंभार यांच्या समाधी असलेल्या तेर (जि. उस्मानाबाद) इथे दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तेर येथील बाल वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात ध्वजाचे स्वागत करून पूजा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT