Kisan Sabha, Eknath Shinde
Kisan Sabha, Eknath Shinde Sarkarnama
नगर

Kisan Sabha: मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या 'लाँग मार्च'ची दखल,सरकारचं शिष्टमंडळ आंदोलकांच्या भेटीला,तोडगा निघणार?

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar : किसान सभा शेतकरी,आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतची सह्याद्री अतिथीगृहावर झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर लाल वादळ रस्त्यावर उतरले आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली अकोले ते लोणी लाँग मार्च बुधवारी (दि.२६) दुपारी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले(Dr. Ajit nawale) यांच्या नेतृत्वाखाली अकोले ते लोणी असा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात अनेक मान्यवरांसाठी हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. महसूल मंत्री व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या लाँग मार्च आणि प्रश्नांची मोर्चाची दखल घेतली आहे.

राज्य सरकारच्या प्रतिनिधींची आज शेतकरी नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सरकारकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित गुरुवारी (दि.२७) आंदोलकांच्या भेटीला येणार आहेत. ही बैठक संगमनेरच्या प्रांत कार्यालयात होणार असून सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

सरकारच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा होणार आहे. बैठकीत तोडगा निघाल्यास लाँग मार्च स्थगित करण्यात येणार आहे. अन्यथा लाँग मार्च सुरूच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. किसान सभेच्या पुढाकाराने राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे. अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागी होणार आहे.

हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल व दुग्धविकास मंत्रीराधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT