पाथर्डी (नगर) : भगवान गडावरील संत भगवानबाबा यांनी वापरलेल्या वस्तुंच्या संग्रहातील बंदुकीचा सांगाडा व एक जुनी तलवार बुधवारी रात्री चोरट्यांनी चोरुन नेली आहे. गडाचे विश्वस्त अँड. जगन्नाथ बटुळे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांनी गडावर भेट देवुन पाहणी केली.
भगवान गडावर संत भगवान बाबांनी वापरलेल्या विविध वस्तुंचे संग्रहालय दर्शनी भागात आहे. बुधवारी रात्री चोरट्यांनी वस्तु संग्रहालयाचे कुलुप व कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश केला. तेथील देखावा म्हणुन लावलेली बंदुकीचा सांगाडा किंमत दीड हजार रुपये व जुनी तलावर किंमत तिनशे पन्नास रुपये असा एकहाजर आटशे पन्नास रुपयाचा ऐवज चोरून नेला.
गडावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता मध्यरात्री तिघेजण दुचाकीवरुन आले. त्यांनी वस्तुसंग्रहालयाचे दरवाज्याचा कडीकोयंडा तोडला व आता प्रवेश केला. एक बंदुकीचा सांगाडा व एक जुनी तलवार चोरुन नेली. मात्र हे चोरटे कोण आहेत, हे स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे आता चोरटे शोधुन काढने, हे पोलिसासमोरचे आव्हान आहे. दिवसभर राज्यभरातुन भक्तांचे फोन भगवान गडावर येत होते. गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री महाराज यांची पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांनी भेट घेतली. पोलिस हवालदार सुरेश बाबर तपास करीत आहेत.
संत भगवान बाबांनी स्वतः वापरलेल्या बंदुकीचा सांगाडा व जुनी तलवार चोरीला गेल्याची घटना घडल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी सोशल मिडीयावरुन तालुक्यात पसरले. बाबांच्या वस्तुंची चोरी करण्याची हिंमत कोणी केली. तिनही चोरट्याला अटक झालीच पाहिजे, अशा पोस्ट दिवसभर सोशल मिडीयातुन फिरत होत्या. भगवान बाबांच्या भक्तामधे यामुळे नाराजीचे वातावरण पसरले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.