नगर

थोरातांच्या संगमनेरमध्ये विखे पाटलांची गटनिहाय मोर्चेबांधणी

सरकारनामा ब्यूरो

संगमनेर ः राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सोमवार ( ता. 12 ) रोजी संगमनेर तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील महायुतीच्या जनसंपर्क आणि माहीती सुविधा केंद्राचे उद्घाटन होणार आहे.

शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी संगमनेरात महायुतीचे कार्यालय सुरू करण्याच्या घोषणेच्या पूर्तीसाठी शासकीय विश्राम गृहासमोरील व्यापार संकुलात सर्व सुविधांनी परिपूर्ण असे महायुतीचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून, त्याचे उद्या औपचारिक उद्घाटन होणार आहे.

या कार्यालयातून राज्य सरकारच्या विविध योजनाची माहीती तसेच विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांचे मार्गदर्शन आणि ऑनलाईन पध्दतीने योजनेचा लाभ मिळविण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

विखे पाटील यांच्या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या या दौऱ्यात भाजप, शिवसेना आणि महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या जिल्हा परिषद गटनिहाय बैठका मंत्री विखे पाटील घेणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार ( ता. 18 ) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्ताने नियोजन आणि शहरातील सभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

तालुक्य़ात प्रथमच येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या जोरदार स्वागताच्या पार्श्वभुमिवर शहरातील व्यापारी आणि डॉक्टराची स्वतंत्र बैठक व तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत शासनाच्या विविध योजनांच्या निधीची अंमलबजावणी आणि प्रलंबित प्रश्नाचा आढावा जाणून घेणार आहेत. महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा अकोले तालुक्यातून सुरू होत असून, अकोले, संगमनेर येथील सभेच्या नियोजनासाठी भाजपाचे प्रदेश स्तरावरील नेते आणि यात्रा संयोजकांनी आज सभेच्या ठिकाणाची पहाणी केली. वेळापत्रकानूसार 18 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता मुख्यमंत्र्याच्या सभेचे नियोजन आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT