sujay vikhe patil
sujay vikhe patil 
नगर

विखे पॅटर्न चारही पक्षांना पुरून उरेल : सुजय यांचा दावा

सरकारनामा ब्यूरो

पाथर्डी ः राज्यातील सरकार वर्षाचादेखील कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. जिल्ह्यामध्ये विखे संपवण्यासाठी चारही पक्ष एकत्र आले, तरी विखे पॅटर्न सर्वांना पुरून उरेल, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

पाथर्डी नगरपरिषदेच्या कार्यालयात आढावा बैठकीत विखे बोलत होते. या वेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर होते. नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष बजरंग घोडके, नंदकुमार शेळके, नगरसेवक रमेश गोरे उपस्थित होते.

विखे म्हणाले, की आमदार मोनिका राजळे यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेतील अनुदानासह पाणीपुरवठा योजना व इतर मूलभूत सेवा-सुविधा शहरवासीयांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. प्रास्ताविक डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन अय्यूब सय्यद यांनी केले. आभार रमेश गोरे यांनी मानले.

विखेंच्या या दौ्ऱ्याची विरोधकांनी खिल्ली उडविली.  डॉ. सुजय विखे पाटील यांचा आढावा बैठकीचा केवळ फार्स चालू आहे. विकासकामांसाठी निधी देणार का? पाच वाजता वेळ देऊन विखे रात्री साडेआठ वाजता पालिकेत आले. तेथेही राजकीय भाषणबाजी करीत बसले. कुठल्याही विभागाचा साधा आढावा घेतला नाही. यामुळे ही आढावा बैठक नसून खा. विखेंचे हे वैयक्तिक संपर्क अभियान आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. दोन महिन्यांपूर्वी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात विखेंनी तहसील कार्यालयामध्ये बैठक घेऊन 31 डिसेंबर 2019 पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे जाहीर केले होते. त्याचे काय झाले, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडू पाटील बोरुडे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT