Ahmednagar Municipal Corporation
Ahmednagar Municipal Corporation 
नगर

नगर महापालिकेत राष्ट्रवादीने केलेल्या मदतीची भाजप परतफेड करणार का?

सरकारनामा ब्युरो

नगर : नगर महापालिकेच्या महापौरपदाचे पुढील वर्षांचे आरक्षण जाहीर झाले असून, ते अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आहे. या प्रवर्गातील उमेदवार भाजपकडे नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या उमेदवाराला संधी मिळू शकते. महापौर निवडीच्या वेळी राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपचे महापौर होवू शकला. त्यामुळे आता भाजप या उपकाराची परतफेड करणार का? याबाबत उत्सुकता आहे.

पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला साथ दिली. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदाची संधी मिळाली.  महापालिकेच्या निवडणुकीत भाजपालाअवघ्या 14 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीला 18 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षश्रेष्ठींना विश्वासात न घेता महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे  तब्बल 24 जागा मिळवीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेचा महापौर होवू शकला. 

त्या वेळी महायुतीचा धर्म सोडून भाजपनेही शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला होता. बहुमताचा 35 हा जादुई आकडा पूर्ण करण्यासाठी त्या वेळी बसपच्या चार जणांनी साथ केली.राज्यात सुरू राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीला भाजप मदत करेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT