Amravati Guardian Minister Yashomati Thakur Drove Bullock Cart
Amravati Guardian Minister Yashomati Thakur Drove Bullock Cart 
नागपूर

यशोमती ठाकूर यांनी चालवली बैलगाडी (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो

अमरावती : अमरावतीच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून आगळं वेगळं स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकूर यांनी बैलगाडीचा दोर आपल्या हातात घेत बैलगाडी सुद्धा हाकली.

यशोमती ठाकूर ह्या संपूर्ण ग्रामीण असलेल्या तिवसा मतदारसंघाच नेतृत्व करत आहे, अमरावती तालुक्यातील नांदुरा लष्करपूर इथे त्यांनी भेट दिली, तेव्हा चक्क गावकऱ्यांनी उस्फूर्तपणे बैलगाडीतून मिरवणुकीने काढून त्यांचे  स्वागत केले. यशोमती ठाकूर यांनी स्वतः आपल्या हातात बैलगाडीचा दोर हातात घेऊन बैलगाडी सुद्धा चालवली.  मंत्र्याची बैलगाडीतून वाजत गाजत निघालेली ही मिरवणूक अमरावती जिल्हात चर्चेचा विषय बनली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT