नागपूर

आमदार बच्चू कडू झाले आक्रमक..म्हणाले 'मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतरही झाले नाही पुनर्वसन'

सरकारनामा ब्युरो

अमरावती : वासनी प्रकल्पबाधित खारपाणपट्ट्यात असलेले बोरगावपेठ गावाचे पूर्णतः पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देऊनही अद्याप कार्यवाही न झाल्याने अचलपूर मतदारसंघातील विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आता आक्रमक झाले आहेत. आपल्या मतदारसंघातील कामे करवून घेण्यासाठी त्यांनी विधिमंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. 

अचलपूर जिल्हा निर्मिती तसेच चांदूरबाजार तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या आसेगाव व चिखलदरा तालुक्‍यातील चुर्णी गावाला तालुक्‍याचा दर्जा देण्यात यावा, अचलपूर येथे मंजूर असलेल्या 200 खाटांचे सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय, अचलपूरला स्त्री रुग्णालय तसेच आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांची तातडीने भरती करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. सोबतच राजुरा मध्यम प्रकल्पात जमीन गेलेल्या चांदूरबाजार तालुक्‍यातील बेलोरा व राजुरा येथील शेतकऱ्यांना उर्वरित जमिनीच्या सिंचनाची व्यवस्था प्रकल्पातील पाणी राखीव ठेवून करण्यात यावी, सर्वांत कमी खर्चात सर्वांत जास्त सिंचनाचे उद्दिष्ट्य पूर्ण करणाऱ्या बेलोरा-गणोजा प्रकल्पास तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देयात यावा, अशी मागणीसुद्धा आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. 

पूर्णा प्रकल्पातील 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अचलपूर येथे 300 एकरच्या जागेवर कृषी महाविद्यालय स्थापनेच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी, परतवाडा येथे बंद पडलेल्या शासकीय दूध शीतकरण केंद्र पूर्ववत सुरू करण्यासाठी पीपी तत्त्वावर हस्तांतरित करण्यात यावे, अचलपूरच्या एमआयडीसीचा विस्तार व चांदूरबाजार येथे नवीन एमआयडीसी तयार करण्यात यावी, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT