chandrashekhar bavankule demands speedy delivery of justice in hinganghat case
chandrashekhar bavankule demands speedy delivery of justice in hinganghat case 
नागपूर

`हिंगणघाट'मधील आरोपीला महिनाभरात शिक्षा द्या : चंद्रशेखर बावनकुळे

सरकारनामा ब्युरो

नागपूर - हिंगणघाटमधील नंदोरी चौकात 3 फेब्रुवारी रोजी विकृत युवकाने प्राध्यापक युवतीवर पेट्रोल टाकून जाळले. पिडीतेचे आज सकाळी 6.55 वाजता निधन झाले. याप्रकरणी आरोपीला महिनाभरात कठोर शिक्षा देण्याची मागणी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मेडिकल इस्पितळात जाऊन या युवतीच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेतले व तिला श्रद्धांजलीन अर्पण केली.

ते म्हणाले, अशा घटनांची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून सर्व बाबींचे पालन करून कडक कायदा करण्यात यावा व आरोपीला महिनाभरात शिक्षा देण्यात यावी. अत्यंत गंभीर अशी घटना असून या परिवारातील व्यक्तीला शासनाने नोकरी द्यावी आणि आर्थिक मदत करावी. गेल्या आठ दिवसांपासून ही युवती मृत्यूशी झुंज देत होती. आज अखेर काळाने तिच्यावर झडप घातली. या प्रकरणी समाजात तीव्र संताप असून युवतीच्या दारोडा या गावात नागरिकांना दगडफेक करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहे. शासनाने या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी व शक्‍य तेवढ्या लवकर आरोपींला शिक्षा द्यावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT