नागपूर

अमरावती महापौरपदी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदी कुसुम साहू यांची निवड

अरुण जोशी

अमरावती - अमरावती महानगरपालिकेच्या १६ व्या महापौर, उपमहापौर पदाकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचे चेतन गावंडे तर उपमहापौर पदी कुसुम साहू हे विराजमान झाले आहे. महापौर व उपमहापौर पदांच्या नावाची घोषणा होताच अमरावती महानगरपालिका मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. अमरावती महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज अमरावती महापालिकेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष सभेच आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ११ वाजता या सभेला सुरुवात करण्यात आली. आधी महापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली.  यामध्ये भाजपाकडून चेतन गावंडे, एमआयएमकडून अफजल हुसेन मुबारक हुसेन तर बहुजन समाज पार्टी कडून माला योगेश देवकर उभे होते.  यात चेतन गावंडे यांना ४९ मते मिळाली तर एमआयएमच्या अफजल हुसेन याना २३ मते मिळाली तर बसपाच्या माला देवकर याना केवळ 5 मते मिळाली. आजच्या निवडणुकीत शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली होती तर काँग्रेस ने एमआयएमला पाठिंबा दिला होता.  

अमरावती महानगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता असल्यामुळे चेतन गावंडे, कुसुम साहू यांची निवड नक्की मानल्या जात असली तरी एमआयएम आणि बसपा  यांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.  महापौर पदाकरिता सकाळी ५ उमेदवाराचे ६ अर्ज वैध ठरविण्यात आले त्यांनतर काँग्रेसच्या प्रदीप हिवसे व विलास इंगोले यांनी आपले नामांकन परत घेत एमआयएमला पाठिंबा दिला.  

मतदान प्रक्रिया ही  हात उंच करून घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दोघांच्या नावाची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी महापालिकेत एकच जल्लोष केला  अमरावती शहरातील मूलभूत सोयी तसेच महापालिकेचे आर्थिक स्रोत वाढविण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजप चे सर्व पदाधिकारी,नगरसेवक यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT