cm-@-Tukadoji-Maharaj
cm-@-Tukadoji-Maharaj 
नागपूर

राष्ट्रसंतांच्या विचारात समाज परिवर्तनाची शक्ती : देवेंद्र फडणवीस 

अरुण जोशी

अमरावती : " वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भूमीत आपण मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर गुरुदेवांचा अनुयायी म्हणून येथे आलो आहे. २०१३ साली मी कार्यक्रमात आलो असता मला महाराजांचा आशीर्वाद व ऊर्जा मिळाली व त्यानंतर थेट आपण मुख्यमंत्री झालो ,"असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवात गुरुकुंज मोझरी येथे व्यक्त केलं. 

 जगाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सव गुरुकुंज मोझरी येथे सुरु आहे. सोमवारी लाखो गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली दिली. आज या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांचे गुरुकुंज मोझरी येथे आगमन झाल्यानंतर त्यानी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेतले व अधिस्थानाचे पूजन केले. राष्ट्रसंतांच्या  महासमाधिला ५० वर्ष झाल्यानंतरही त्यांना मानणारे लाखो अनुयायी आजही समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत यावरून राष्ट्रसंतांच्या ताकदीचा व त्यांच्यातील ऊर्जेचा प्रत्यय आपल्याला येतो तर महाराष्ट्राचे सरकारही राष्ट्रसंतांच्या विचाराने मार्गक्रमण करीत राहील असे मत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून यावेळी व्यक्त केले 

या कार्यक्रमादरम्यान गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने आश्रमाच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यापैकी ५८ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देत असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली तर उर्वरित ४२ कोटी रुपयांचा आराखडा सादर केल्यानंतर त्यालाही मान्यता देण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी मंडळाच्या श्री गुरुदेव मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT