thakrey_Fadanvis.
thakrey_Fadanvis. 
नागपूर

नागपुरात देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे यांची जुगलबंदी रंगणार 

राजेश चरपे

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर येणार आहेत. सत्तापालट आणि युती तुटल्यानंतर दोन्ही नेते प्रथमच एकत्र येणार असल्याने हा कार्यक्रम लक्षवेधी ठरणार आहे.

विद्यापीठाच्या इमातरतीचे उद्घाटन 19 डिसेंबरला राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्री युती तुटल्यानंतर एकत्रित येणार आहेत. विशेष म्हणजे या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. 

त्यामुळे उद्‌घाटनही त्यांच्याच हस्ते व्हावे अशी विद्यापीठाची प्राजंळ इच्छा होती. मात्र राज्यात आता सत्तांतर झाले आहे. विद्यापीठाने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले असून रविवारी यासंदर्भात कुलगुरू मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय कोपरखळ्या आणि टोलेबाजी होण्याची शक्‍यता असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्तेत असताना फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगली मैत्री होती. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला. निवडणुकीदरम्यान काही राजकीय घडामोडी आणि राष्ट्रवादीसोबत भाजपने सत्ता स्थापनेचा घातलेल्या घाटामुळे दोन्ही पक्षांत चांगलेच वितुष्ट आले आहे.

सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा याची धार वाढणार आहे. याच काळात विद्यापीठाच्या कार्यक्रमात दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्री एकत्र येणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT