नागपूर

महिला फौजदाराचा विनयभंग : भाजप आमदार, शहराध्यक्ष यांच्यावर गुन्हा

Abhijeet Ghormare

भंडारा  : भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची तक्रार तुमसर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली आहे. त्यानुसा कलम 354 अन्वये तुमसर भाजपा शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्यासह वाघमारे यांच्यावर  गुन्हा दाखल, अद्याप कुणालाही अटक नाही. एका कार्यक्रमादरम्यान ही विनयभंगाची घडल्याचे सांगण्यात आले.

याबाबत वाघमारे यांनी सर्व आरोप फेटाळले. मी जर दोषी असेल तर लगेच मला अटक करा. आजच चौकशी पूर्ण करा. मी तेथे मदतीसाठी गेलो होतो. तेथे अनेक कामगार हजर होते. त्यांच्याकडे चौकशी करून पोलिसांनी निर्णय करावा, असे वाघमारे यांनी सांगितले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT