Sarkarnama
Sarkarnama  
नागपूर

भर पावसात पेटली घुग्घुस नगर परिषद, हेतुपुरस्सर आग लावल्याची शक्यता...

मनोजकुमार कनकम

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पावसाची जोरदार एंट्री झाली Heavy rain entered in the city असून रात्रंदिवस सारखा पाऊस धो धो बरसत आहे. असे असताना नगरपरिषद इमारतीला आग लागली आणि कागदपत्रे जळून खाक झाली. भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी ही आग लावली गेली असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. Possiblilty of setting fire to destroy evidence. 

गेल्या २७ वर्षांनंतर ३१ डिसेंबर २०२०ला घुग्घुस नगरपरिषद अस्तित्वात आलेली आहे. घुग्घुस वासीयांच्या अनेक आंदोलनानंतर घुग्घुस ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाले. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेला महिला मुख्याधिकारी म्हणून आर्शिया शेख यांची नियुक्तीसुद्धा झाली. नगरपरिषदेचे कामकाज काही प्रमाणात सुरू झाले मात्र ८ सप्टेंबरला पहाटे घुग्घुस नगरपरिषदेच्या इमारतीला भीषण आग लागली. या आगीत अनेक महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण आगीच्या रौद्र रूपावर नियंत्रण मिळविण्यास वेळ गेला व महत्त्वाची कागदपत्रे जळाली. एसीसी सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून आगीत अजून किती नुकसान झाले हे पोलीस तपासात पुढे येणार आहे. आग कशी लागली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. या आगीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. घुग्घुस ग्रामपंचायतीच्या काळात येथे ९ कोटी ५१ लाख रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता त्याचा तपास हा थंड बस्त्यात आहे. येणाऱ्या काळात ही फाईल उघडली जाऊ शकते. आज जळालेल्या कागदपत्रांत त्या कागदपत्रांचा समावेश तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

गेल्या पंचवार्षिकमध्ये विकास कामांत अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्या संदर्भातील दस्तऐवज नष्ट करण्यासाठी तर ही आग लावण्यात आली नाही ना, अशी चर्चा नागरिक करीत आहेत. नगरपरिषदेत लागलेल्या आगीची तक्रार पोलिसांत करण्यात येणार आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, असे नगर परिषदेच्या सीईओ आर्शिया जुही यांनी सांगितले. 

उच्चस्तरीय चौकशीची काँग्रेसची मागणी..
आज पहाटेच्या सुमारास घुग्घुस नगरपरिषदेला आग लागली यामध्ये महत्वपूर्ण कागदपत्रांसह इलेक्ट्रिकल साहित्य जळाले आहे. गेल्या आठवड्यातच सदर दस्तावेज दुसऱ्या ठिकाणावरून या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने ही लागलेली आग ही पचनी पडत नाही. नगरपरिषद झाल्यानंतर अजूनही निवडणूक झालेली नाही. या ठिकाणी ग्रामपंचायत काळातील कागदपत्रे आणि साहित्य होते. यामध्ये तत्कालीन ग्रामपंचायत सरपंचांवरील ०९ कोटी ५१ लाख रुपयांचा भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्रे असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर सरपंच हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अशीच आग जिल्हा परिषदमध्ये देखील लागली होती. तेव्हाही ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार प्रकरण हा तापले होते. घटनेची सत्यता ही सीसी टीव्ही मध्ये येण्याची शक्यता नाही. कारण मागील भागात सीसी टीव्ही कॅमेरे नाहीत. एकंदरीत ही आग हेतुपुरस्सर लावण्यात आल्याचीच जास्त शक्यता वाटत असल्याने सदर आग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी काँग्रेस पक्षातर्फे नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर्शिया जुही यांना करण्यात आले. सीईओंनी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्यासह अन्य पदाधिकारी होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT