नागपूर

मुख्यमंत्री शिवसेनेचा होण्यासाठी शिवसैनिक सायकलने यवतमाळहून तुळजापूरला

सरकारनामा ब्युरो

यवतमाळ : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा, यासाठी येथील एक ज्येष्ठ शिवसैनिक महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता तुळजाभवानीला साकडे घालण्यासाठी काल येथील दत्त चौकातून निघाले आहेत. सायकलने यवतमाळ ते तुळजापूर असा सुमारे 400 किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता एक महिना होणार आहे. तरीसुद्धा सत्तेचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्री पदाची आस मनात बाळगून असलेल्या शिवसेनेने भाजपची साथ सोडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. परंतु शिवसेनेच्या नेतृत्वात अजूनही सत्ता स्थापन झाली नाही. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपशहरप्रमुख गिरीश व्यास सायकलने यवतमाळवरून तुळजापूरकडे रवाना झाले आहेत. "राज्याच्या विधानभवनावर शिवसेनेचा भगवा फडकू दे आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होऊ दे', असे साकडे ते आई तुळजाभवानीला घालणार आहेत.

स्थानिक दत्त चौकात शिवसैनिकांनी जयघोष करीत गिरीश व्यास यांचे मनोधैर्य वाढविले. यावेळी संतोष ढवळे, पिंटू बांगर, राजू नागरगोजे, दिनेश इंगळे, राजू मेहरे, विनोद राऊत, रवी राऊत, सोमेश्‍वर गावंडे, अनिकेत थोरात, गोलू मिरासे, सुदेश राठोड, निखिल आंबेकर, प्रदीप मिरासे, निखिल दांडेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

आर्णी येथेही स्वागत
गिरीश व्यास यांचे काल दुपारी तीन वाजता आर्णी येथे आगमन झाले असता त्यांचे स्वागत माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, "प्रहार'चे प्रमोद कुदळे, नगरसेवक प्रवीण मुनगीनवार, लक्ष्मण पठाडे, फय्याज शेख, अमोल माळवे, राधेश्‍याम वानखडे, सुदाम राठोड, चंद्रकांत जयस्वाल, प्रकाश सरोदे, मारुती दांडेकर, दिगांबर माहुरे यांनी केले आणि तसेच पुढील प्रवासासाठी शुभेच्छासुद्धा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT