नागपूर

खासदार नरसिंव्हा राव सरसंघचालकांच्या भेटीला; आंध्राच्या राजकिय स्थितीचे रिपोर्टिंग ?

सरकारनामा ब्युरो

नागपूर : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्‍ते, राज्यसभेचे खासदार जीव्हीएल नरसिंव्हा राव यांनी सरसंघचालक डॉ. मोहन
भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. या भेटीसाठी नरसिंह राव मंगळवारी संध्याकाळी नागपुरात येऊन गेले. त्यामुळे पश्‍चिम बंगालप्रमाणे आंध्र प्रदेशच्या निकालाचे रिपोर्टिंग झाल्याची चर्चा संघपरिवारात रंगते आहे.

लोकसभा निवडणुकांचा अतिंम टप्पा संपताच संघभुमी नागपुरात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे भाजपचे सरचिटणीस व पश्‍चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी नागपुरात येऊन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची भेट
घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. त्यातच लागलीच दुसऱ्या दिवशी खासदार जीव्हीएल नरसिंव्हा राव यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली असून ही
भेट वैयक्तिक असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर येथे येऊन सरसंघचालकांना 20 मे रोजी भेटणार असल्याचा दौरा 17 मे रोजी ठरला होता. इतच नव्हे तर तशा व्यवस्था करण्याचे स्थानिक संघ पदाधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र दिल्लीतील एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने या दौऱ्याबाबत बातमी प्रसिद्ध केल्याने अचानक हा दौरा रद्द झाल्याचे संघमुख्यालयातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT