नागपूर

पालकमंत्री बावनकुळेंच्या कामठीत विकासकामांना मिळाला कौल

सरकारनामा ब्युरो

नागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार टेकचंद सावरकर यांचा 7 हजारांपेक्षा अधिक मतांनी झालेला विजय हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे झाला. तसेच विकासकामांच्या बाजूने जनतेने दिलेला हा कौल आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

कॉंग्रेस उमेदवाराला या मतदारसंघातील मतदारांनी नाकारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी या मतदारसंघासाठी दिला. त्यामुळे गेली पाच वर्षे येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे व विविध योजना राबविणे शक्‍य झाले. जनतेने विकासकामांना मतदान केले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी या मतदारसंघाला प्राप्त झाला. ती कामेही सुरू आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून सावरकर निवडून येतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी आधीच व्यक्त केला होता. आता सावरकर जोमाने जनतेची कामे करतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपण स्वतः पूर्णवेळ या मतदारसंघात काम करणार आहोत. आपल्यावर कोणताही अन्याय झाला नाही. या मतदारसंघातील जनतेशी माझे कौटुंबिक संबंध असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व मतदारसंघाचा अधिक विकास करण्यासाठी आपण 24 तास उपलब्ध राहणार असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

विजयानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानासमोर भाजप कार्यकर्त्यांनी ढोलताशांसह नाचून आनंद व्यक्त केला, तसेच फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT