नागपूर

नरेंद्र मोदींनी चार वर्षे वाया घालविली : प्रवीण तोगडीया

अयोध्येतील राममंदिराच्या निर्माणासाठी संसदेने कायदा करण्याचीच आवश्‍यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केल्यास तेथे बाबरी मशीदही उभी राहील, असा युक्तीवाद करीत विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडीया यांनी न्यायालयीन निवाड्याला विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार वर्षे वाया घालवली, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

सरकारनामा ब्युरो

नागपूर : अयोध्येतील राममंदिराच्या निर्माणासाठी संसदेने कायदा करण्याचीच आवश्‍यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केल्यास तेथे बाबरी मशीदही उभी राहील, असा युक्तीवाद करीत विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडीया यांनी न्यायालयीन निवाड्याला विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार वर्षे वाया घालवली, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

डॉ. तोगडीया यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी चर्चा करताना राममंदिराच्या संदर्भात केंद्र सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधी भूमिका स्पष्ट केली आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेबद्दल सध्या सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने केवळ जमीनीच्या मालकीहक्काबद्दल निवाडा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या मतामुळे राममंदिर उभारण्यासाठी 1100 चौरस मीटरचा भूखंड मिळेल परंतु उर्वरित 67 एकर जागेमध्ये मशीद उभी राहील. राममंदिराच्या बाजूला बाबरी मशीद विहिंपला कदापि मान्य नसल्याचे सांगत डॉ. तोगडीया यांनी वेगळी भूमिका मांडली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य राहील, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेली आहे. याकडे लक्ष वेधले असता डॉ. तोगडीया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला.

न्यायालयाचाच निवाडा मान्य करायचा होता तर आतापर्यंत वेळ का दवडला? असा सवाल करून डॉ. तोगडीया म्हणाले, ''राममंदिरासाठी लोकांनी गोळ्या झेलल्या, अनेकजण कारागृहात गेले. ते न्यायालयाचा निर्णय मान्य करण्यासाठी नाही. भारतातील जनतेने पूर्ण बहुमताने केंद्रात सरकार आणले. राममंदिरासाठी भाजपने जनतेला वचन दिले आहे. हे वचन कायदा करून पूर्ण करावे. या संदर्भात न्यायालयाने याचा निवडा ऐकण्यासाठी जनतेनी बहुमत दिलेले नाही,"

गेल्या चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्याही क्षेत्रात प्रभाव पाडता आला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, बेरोजगारीचा प्रश्‍न, शेतमालांचे भाव या सर्व प्रश्‍नांवर मोदी यांना कोणतेही भरीव कामगिरी करता न आल्याने ही चार वर्षे वाया गेली, असा टोला डॉ. तोगडीया यांनी हाणला. मोदी केवळ खूप 'मन की बात' करतात. आता मी मनातील गोष्ट करतो, असे सांगत त्यांनी मोदी यांच्यावर उघडपणे टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT