gajanan_kirtikar
gajanan_kirtikar 
नागपूर

मंत्री बावनकुळे, बडोले यांना सत्तेचा माज चढला आहे  : गजानन कीर्तिकर

सरकारनामा

नागपूर :  " राज्यातील मंत्री बावनकुळे, बडोले यांना सत्तेचा माज चढला आहे. त्यांचा माज उतरविण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,"  अशी भाषा शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी पत्रकार परिषदेत वापरली . 

शिवसेनेतर्फे गुरुवारी वर्धमाननगरातील हार्दिक लॉनमध्ये आयोजित पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   

शिवसेनेला पूर्व विदर्भातून  लोकसभेत चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा-गोंदियासहया चार जागा आणि  विधानसभेच्या 15 ते 20 जागा निश्‍चितच मिळविता येतील. आम्ही  निवडणुका स्वतंत्रच लढणार, भाजपसोबत जाणार नाही.  तिसरी आघाडी किंवा कॉंग्रेससोबत जाण्याचा प्रश्‍नच नाही. सर्व निवडणुका स्वबळावरच लढणार, गडकरींनाही सोडणार नाही, असे श्री.  कीर्तिकर यांनी ठणकावून सांगितले.

नागपुरात विकासाच्या नावाखाली मंदिर हटविले जात आहेत. रस्त्यावरीलच काय गल्ली बोळातील मंदिरे पाडली जात आहेत. मशिदींना मात्र हात लावला जात नाही. याविरोधात जनतेत रोष असून शिवसैनिक संघर्ष करतील.  

यापूर्वी कॉंग्रेस विरोधी मतांची आम्हाला साथ होती. आता संघटना बांधणीवर आवश्‍यक आहे. बूथनिहाय नियुक्‍त्यांसह एकही पद रिकामे राहू नये, याची काळजी घेतली जाईल. पदाधिकाऱ्यांवर नियंत्रणासाठी समन्वयक म्हणून अनिल नेरकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्व गटतट मोडून काढले जाईल. जुन्या शिवसैनिकांना परत बोलावून जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. 10 दिवसांमध्ये नागपूरची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

 पत्रकार परिषदेला खासदार आनंदराव अडसूळ, खासदार कृपाल तुमाने, उपनेते अशोक शिंदे, आमदार बाळू धानोरकर, जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT