Sanjay Gaikwak MLA Buldana
Sanjay Gaikwak MLA Buldana 
नागपूर

आमदार गायकवाड यांची वारकऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

सरकारनामा ब्यूरो

अकोला : बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड (Buldana's MLA Sanjay Gaikwad) यांनी उपवास-तापासाची ही वेळ नाही, कोरोना काळात देवही वाचवायला येत नाही. (In the Corona period, even God does not come to the rescue) असे वक्तव्य केले. ते एका स्थानिक वृत्तपत्रात छापून येताच वारकऱ्यांकडून यावर तीव्र आक्षेप नोंदवला जात आहे. दरम्यान अकोल्यातील एक वारकरी प्रकाश महाराज पांडे (Prakash Maharaj Pande) यांनी आमदार गायकवाडांना कॉल केला होता. या कॉलवर आमदारांनी प्रकाश महाराजांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ही क्लिप सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. (This clip is currently going viral on social media)

अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील अनेक वारकऱ्यांकडून आमदार जाधव यांना फोन करून आपल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान अकोल्यातील वारकरी प्रकाश महाराज पांडे यांनी कॉल केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार गायकवाड यांनी वारकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. त्यावर आमदार गायकवाड यांनी ३१ मे ला सर्व महाराजांनी सिंदखेड राजा येथे यावे, मी चर्चेस तयार आहे, असे म्हटले. 

दरम्यान प्रकाश महाराज यांनी त्यांना ३१ मे कशाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रिकामेच आहोत, तेव्हा आता एक दोन दिवसांतच कुठे यावे लागते, ते सांगा, आम्ही येतो असे म्हटले. आमदार गायकवाड यांनी यावर पांडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फोन कॉलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावर विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी सर्व वारकऱ्यांनी एकत्र येत आमदार गायकवाड यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आवाहन केले आहे.

यापूर्वी अच्युत महाराज बोर्डे या वारकऱ्याने आमदार गायकवाड यांना फोन केला असता, आमदार गायकवाड यांनी सर्व महाराजांनी जिजाऊ सृष्टीवर येऊन आमने सामने करावे, असे म्हटले होते. आमदार संजय गायकवाड यांनी असे म्हटले आहे की, मला अजिबात फोनवर बोलायला वेळ नसून आता लॉकडाऊन संपल्यावर ३१ मे सर्व महाराजांनी जिजाऊ सृष्टी म्हणजे सिंदखेडराजा येथे यावे आणि आमने सामने होऊन जाऊ दे, असे फोनवर म्हटले होते. त्यानंतर आता ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 

विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी या संदर्भात संजय गायकवाड यांनी तमाम वारकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी अजूनही लावून धरली आहे. आमने सामने म्हणजे काय कुस्ती खेळायला गायकवाड यांनी बोलावले का, असा सवाल शेटे महाराज यांनी विचारला आहे. विश्व वारकरी सेनेचे महाराज आणि आमदार गायकवाड यांच्यामध्ये मध्यस्थी करायला अद्याप तरी कुणी पुढे आलेले नाही. आमदार आपल्या बोलण्यावर ठाम आहेत आणि त्यांनी माफी मागावी, या मागणीवर महाराज ठाम आहेत. त्यामुळे या प्रकरणात तोडगा निघेल कसा, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मुस्लीम समाजातील लोक जास्त प्रमाणात मांसाहार करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तुलनेत हिंदू धर्मीयांमध्ये मांसाहार करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हिंदूंनी उपास-तापास करू नका आणि मांसाहार करा, असे वक्तव्य बुलडाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. ते स्थानिक वृत्तपत्रांमध्ये छापूनही आले होते. त्यामुळे वारकऱ्यांच्या आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, असे विश्व वारकरी सेनेचे संस्थापक गणेश महाराज शेटे यांनी म्हटले आहे. 
Edited By : Atul Mehere
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT