चंद्रपूर : कोरोनाने उद्भवलेल्या या आणीबाणीच्या काळात (During this emergency caused by Corona) अनेक खासगी रुग्णालयांमध्ये (Privite Hospitals) लोकांची लूट सुरू आहे. सेवाभाव जपण्याच्या या काळात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना पैशांसाठी अक्षरशः छळले जात आहे. सरकारलाही अद्याप यावर नियंत्रण मिळवता आले नाही. पण डॉक्टरांनी सेवाभाव जपल्यास काय होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे (Dr. Chetan Khutemate) यांनी दिले आहे. त्यांच्या रुग्णालयात दगावलेल्या कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांना त्यांनी उपचाराची पूर्ण रक्कम परत केली. (Full refund of treatment)
विनापरवानगी कोरोनाबाधितांवर उपचार, रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, रुग्णांकडून बिलांची अतिरिक्त वसुली, आदी घटनांनी वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणारी बहुतांश खासगी रुग्णालय लुटीचे केंद्र झाली, असा सूर समाजात उमटत आहे. याच निराशेच्या वातावरणात आशेचे किरणही निर्माण होतात. डॉक्टरातील ‘देवमाणूस’ अद्यापही जागा आहे, असा सुखद धक्का देतात. त्यातील एक म्हणजे डॉ. चेतन खुटेमाटे. पैशासाठी मृतदेहांनाही कुलूप बंद करणाऱ्या डॉक्टरांच्या गर्दी डॉ. खुटेमाटेंनी वेगळा आदर्श समोर ठेवला.
त्यांच्या रुग्णालयात दगावलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाइकांना उपचाराची पूर्ण रक्कम परत केली. ही पहिलीच वेळ नाही, नेत्रतज्ज्ञ असलेले खुटेमाटे अनेक गरजवंताच्या शस्त्रक्रिया एक पैसाही न घेता नेहमीच करून देतात. डॉ. चेतन खुटेमाटे शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वत:च्या नेत्र रुग्णालयाला चक्क कोविड हॉस्पिटल बनविले. डॉ. सचिन धगडी हे येथे सेवा देत आहेत. कोरोना रुग्ण बरा झाला किंवा मृत झाला, तरी रुग्णालयाचे बिल घेतलेच जाते. नातेवाईकही आप्त गेल्याचे दु:ख पचवत दवाखान्याचे बिल देत असतात. परंतु, काही डॉक्टर याला अपवाद ठरतात. त्यांपैकी एक म्हणजे डॉ. खुटेमाटे आहेत.
आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या छोटा नागपूर येथील एका रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याची माहिती डॉ. खुटेमाटेंच्या कानावर आली. सामाजिक पिंड असलेल्या डॉ. खुटेमाटे यांनी कोणताही विचार न करता त्या रुग्णाच्या संपूर्ण उपचाराचा खर्च माफ केला. एवढेच नाही, तर भरतीपूर्व घेतलेली रक्कमही नातेवाइकांना परत केली. त्यांच्या या निर्णयाला त्यांचे सहकारी डॉ. सचिन धगडी यांनीही क्षणात होकार दिला. डॉक्टरांच्या या कृतीपुढे संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांसमोर केवळ हात जोडण्याव्यतिरिक्त काहीच नव्हते.
या प्रसंगाने रुग्णालयातील अन्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी डॉ. खुटेमाटे यांच्या मनातील तळमळ, गोरगरिबांविषयीची असलेली आस्था जवळून बघता आली. डॉ. खुटेमाटे यांच्याप्रमाणेच शहरातील अन्य डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा. या संकटकाळात सर्वांनी सेवाभाव दाखवावा. जेणेकरून डॉक्टरांविषयीचे तयार झालेले गैरसमज दूर होऊन पुन्हा डॉक्टर हेच देवदूत आहेत, हे कुणीही नाकारू शकणार नाही, एवढे मात्र निश्चित!
अनेकांच्या चेहऱ्यांवर फुलविले हास्य
डॉ. चेतन खुटेमाटे यांचे वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. आर्थिक दृष्ट्य़ा दुर्बल कुटुंबातील अनेक रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार केले आहेत. गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांसह तेलंगणा राज्यातील रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. अनेकांकडे पैशाची अडचण असल्यास मोफत शस्त्रक्रिया करतात. त्यानंतर आस्थेने विचारपूस करीत गावाकडे जाण्यासाठी त्यांच्या हातात पैसेसुद्धा देतात. यासोबतच गावखेड्यांत ते नियमितपणे आरोग्य शिबिरे घेत असतात. आपल्या ज्ञानाचा फायदा गावखेड्यांतील नागरिकांना व्हावा, एवढीच त्यांची इच्छा असते. शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनेक युवकांना त्यांनी आजपर्यंत मदतीचा हात दिला. यातून अनेक युवक आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करू शकली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.