Maharashtra HSC Exam 2026: नागपूर : बारावी परीक्षेचे दोन पेपर फुटले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे, याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हाट्सअँप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विद्यार्थिंनीचा स्मार्टफोन जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे? याचा पोलिस कसून तपास करीत आहेत. एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे.
सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअप वर आल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता मात्र परीक्षा आधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आला होता.
सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती त्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षकाला तिचा संशय आला. त्यांनी तिची शिक्षकेच्या माध्यमातून जाडाझडती घेतली. तिच्याकडील एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये एका व्हाट्सअप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता, असे पोलिसांनी सांगितले. केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे.
जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये १५ विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळले. या ग्रुपमधील दोन विद्यार्थिनींची चौकशी पोलिस करीत आहेत. एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रुपमधील अन्य १३ विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देत होते. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, हे लवकरच समजेल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.