नागपूर

मराठा समाजाने आरक्षणापेक्षा विकासाला महत्त्व द्यावे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

योगेश बरवड

नागपूर : समाजाचे प्रश्‍न लक्षात घेऊन विकासाची दिशा आपल्यालाच ठरवावी लागते. अनेक क्षेत्रांमध्ये विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी समाजात उद्यमशिलता रूजणे आवश्‍यक आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा विकासाचे व्हिजन ठरवावे, नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे व्हा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा समाज कृती समिती आणि नागपूर शहर मराठा महासंघातर्फे नागपुरातील जैन कलार समाज भवनात "मराठा जागर' या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनाच्या उद्‌घाटनीय सोहळ्यात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, दिलीप जगताप, राजे मुधोजी भोसले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय संघटक प्रतापराव बारस्कर, विदर्भ अध्यक्ष शिरीष राजेशिर्के, शहराध्यक्ष नरेंद्र मोहिते, मराठा बिजनेस फोरमचे अरुण पवार, कविता भोसले, प्रशांत मोहिते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
नितीन गडकरी म्हणाले की, ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्याच्या बळावर विकास पादाक्रांत केला जाऊ शकतो. समाजाच्या विकासाचे व्हिजन निश्‍चित करावे. ते पूर्ण करण्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. 

नरेंद्र पाटील यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या अवस्थेकडे लक्ष वेधत त्यांच्या विकासाच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याचा विश्‍वास दिला. प्रास्ताविक नरेंद्र मोहिते यांनी तर संचालन सुरेखा काकडे यांनी केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT