NMC Nagpur
NMC Nagpur 
नागपूर

राष्ट्रवादीत मरगळ कायम, शिवसेनेचीही कामगिरी सुमार; पण कॉंग्रेस बिनधास्त...

राजेश चरपे

नागपूर : नागपूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेन नेतृत्व बदलण्याचा प्रयोग केला. पण त्यामुळे फारसा फरक पडलेला दिसत नाही. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे Duneshwar Pethe यांनी तर अद्याप कार्यकारिणीही तयार केली नाही. शिवसेनेमध्ये बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे Suresh Sakhare यांचा प्रवेश तेवढा झाला. त्याशिवाय सेनेच्याही हाती फारसे काही लागलेले नाही. यावर कॉंग्रेस मात्र चुप्पी साधून आहे. कारण नागपुरात कॉंग्रेसची व्होट बॅंक मोठी आहे आणि महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यावर पोळा फुटणारच, असा विश्‍वास कॉंग्रेसला आहे. The congress is confident that hive will burst after the announcement of municipal elections. 

महाविकास आघाडीत तीन पक्ष सहभागी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विस्तार यात्रेला ब्रेक लागला आहे. काही फुटकळ कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाच्या मर्यादाही आता स्पष्ट झाल्या आहेत. 

राष्ट्रवादीने नव्या दमाचे पेठे यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे युवकांमध्ये जोश निर्माण होईल, मरगळ झटकल्या जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ती फोल ठरली. आधी जे कार्यकर्ते नियमित आंदोलने करून पक्षाला जिवंत ठेवत होती, तेच चेहरे आताही कायम आहेत. ज्या काही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिला. त्यांपैकी अनेक जण अडगळीतील आहेत. अनेकांची उपयोगिता काहीच नाही, अनेक कार्यकर्ते वादग्रस्त आहेत. 

मिरवणाऱ्या चेहऱ्यांमुळे शहरात खूप काही राजकीय उलथापालथ होईल असे सध्यातरी दिसत नाही. महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यावर यांपैकी किती जण टिकतील, याचाही नेम नाही. पेठे यांना अध्यक्ष होऊन महिना उलटला असला तरी त्यांची कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही. जुन्या व नव्यांचा समावेश करू, असा दावा त्यांनी सुरुवातीला केला होता. मात्र त्यावर कोणाचे एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे सध्यातरी एकला चलो रे असेच धोरण अवलंबिल्याशिवाय पेठे यांना दुसरा पर्याय नाही. 

दुसरीकडे शिवसेनेलाही खूप काही साध्य होण्याऐवजी उलट आधीच्या लोकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचा अपवाद वगळता शिवसेनेच्याही हाती फार काही लागल्याचे दिसून येत नाही. महापालिकेतील सत्ता तसेच राज्यात केव्हाही फेरबदल होण्याची शक्यता असल्याने भाजपचे कार्यकर्ते नाराज असले तरी पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. पक्ष बदलून खूप काही फायदा होईल, असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसचेच कार्यकर्ते फोडण्याऐवजी सेना आणि राष्ट्रवादीसमोर दुसरा पर्याय नाही. या दोन्ही पक्षापेक्षा काँग्रेसची व्होट बँक नागपूरमध्ये मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते बिनधास्त आहेत. त्यावर कोणी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करताना दिसत नाही. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT