Nitin Raut Worried about Grid Failure
Nitin Raut Worried about Grid Failure 
नागपूर

ग्रीड व्यवस्थापन सांभाळण्यासाठी नितीन राउत निघाले विद्युत भवनात

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवेलागणी आवाहनावर प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या उर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांनी केंद्राचा निरोप आल्यानंतर आता विरोध काहीसा कायम ठेवला आहेच. पण  सकारात्मक. नऊ वाजून एक मिनीटांनी  बंद होणाऱ्या दिव्यांचा परिणाम अवघी बत्ती गुल होण्यात बदलू नये, यासाठी ते स्वत: नागपुरातल्या विद्युतभवनातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार आहेत.

या कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगची सुविधा आहे. त्या मार्फत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख केंद्रातील अभियंत्यांशी ते संपर्क ठेवणार आहेत. कोयना येथील जलविद्युत प्रकल्पाबाबत ते अधिकच सावध असून यदाकदाचित ग्रीड तुटले तर ते सुरू करण्यासाठी कोयना सुरू केले जाईल. वीज मंडळाच्या मुंबईतील मुख्यालयातही अभियंते सज्ज आहेत. काल डॉ.राउत यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय वीज मंत्र्यांनी विरोधाचे कारण नाही, असे बजावले होते. 

त्यानंतर राउत सकारात्मक झाले आहेत.दरम्यान वीज क्षेत्रातील तज्झ प्रा. मिलिंद मराठे यांनी घरगुती वापरासाठी भारतातील ३३ टक्के वीज वापरली जाते त्यामुळे विजेचे दिवे बंद केल्याने केवळ ७ टक्के अधिभार कमी होणार आहे ,त्यामुळे कोणताही ताण येणार नाही असे स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT