No screening facilities at toll plaza despite order of nitin raut
No screening facilities at toll plaza despite order of nitin raut 
नागपूर

धक्कादायक : टोल नाक्‍यांवर स्क्रिनिंग नाही, पालकमंत्र्यांच्या आदेशाचे झाले काय?

सरकारनामा ब्युरो

नागपूर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा बंदीसोबतच टोल नाक्‍यांवर स्क्रिनिंग करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केले होते. परंतु, एकाही टोल नाक्‍यावर स्क्रिनिंग होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणार कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कोरोनाचा विषाणू विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून भारतात आला. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची लागण झाली. अनेक जण विमानाने भारतात आले. रेल्वे व ईतर वाहनांनी प्रवासी इतरत्र प्रवास करतात. त्यांच्यामुळे इतरांनाही कोरोना होण्याचा धोका आहे. त्यामुळे विमानतळावरून येणाऱ्यांचे स्क्रिनिंग करण्यात येत असून संशितांना आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. 

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांनी ही लोकांना घराच्या बाहेर न निघण्याचे आवाहन केले. त्यानंतर काही लोक घराबाहेर निघत असल्याचे दिसते. वाहनांवर नियंत्रण मिळविल्यास या विषाणूवर प्रतिबंध घालण्यास मदत होईल. त्यामुळे विमानतळासोबत टोल नाक्‍यांवरही वाहन चालकांचे स्क्रिनिंग करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी जाहीर केले होते. परंतु, नाक्‍यावर वाहन चालकांची स्क्रिनिंगच होत नाही आहे. या टोल नाक्‍यावरून वाहनांचे ये-जा सुरू आहे. शहरातून लोक बाहेर जात असून बाहेरून लोक शहरात येत आहेत. टोल नाक्‍यांवर स्क्रिनिंगची व्यवस्थाच संबंधितांकडून उभारण्यात आली नाही. पालकमंत्र्यांच्या आदेशालाच हवेत उडविल्याचे यावरुन दिसतेय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT