RSS Sarkarnama
नागपूर

RSS Slogan News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नवा नारा? हिंदुत्वाऐवजी...; वृंदावन येथील मंथन शिबिरानंतर मोठे संकेत

Slogan of Rashtriya Swayamsevak Sangh : संघाचं सर्वसमावेशकतेकडं पाऊल...

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जाळं देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेलं आहे. राष्ट्रीय पातळीवरील एक विशाल संघटना म्हणून संघाकडे नेहमीच पाहिलं जातं. तसेच भाजपची मातृसंस्था म्हणूनही संघाचा उल्लेख करण्यात येतो. आतापर्यंत या संघाच्या अजेंड्यावर हिंदुत्वाचा मुद्दा प्रमुख होता.पण आता संघाने आपल्या पुढील वाटचालीत हिंदुत्वाऐवजी भारतीयत्वाचा नारा देणार असल्याबाबत मोठे संकेत दिले आहेत.

मागील काही वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (RSS) तही परिवर्तनाचं वारं वाहू लागं आहे. वेळोवेळी काळानुरुप बदल स्वीकारायचं धोरण संघ राबवत आहेत. आता वृंदावन येथील तीन दिवसीय मंथन शिबिरानंतर आपल्या मूळ चिंतनाला नवा विस्तार देण्याविषयी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. बिगर हिंदूंना संघाशी जोडण्यासाठी भारतीयत्वाचा अजेंडाच राबविण्याच्या विचाराधीन आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘भारतीयत्वा’च्या अजेंड्यावर सखोलपणे काम करण्याची रूपरेषा तयार केली.बळजबरीने किंवा आमिष दाखवून केलेले धर्मांतर रोखणे हे आधीपासूनच संघाच्या अजेंड्यात समाविष्ट राहिले. दुसरीकडे समुदायांमध्ये होणारा संघर्ष थांबवण्याबाबत ठोस पावले उचलण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी संघ हिंदुत्व नाही, तर भारतीयत्वाच्या विचारावर पुढे जाणार असल्याचे संकेत दिले आहे. यात जे नागरिक धर्म, वर्ण किंवा क्षेत्राला दुय्यम मानून भारतीयत्वाला पहिलं स्थान देणार्या लोकांपर्यंत संघ पोहचणार आहे.

गेल्या काही दिवसातल्या सरसंघचालकांच्या भूमिका पाहिल्या तर सर्वसमावेशकतेची आस त्यांना लागल्याचं दिसतं. त्यामुळे आता सरसंघचालकांच्या या वक्तव्यातून संघाचा प्रवास एका नव्या दिशेनं सुरु झाला आहे का याची उत्सुकता आहे. आगामी काळात काही राज्यात विधानसभा तर पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत आहे.

याच पार्श्वभूमीवर संघाच्या मंथन शिबिराला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. यावेळी प्रचारकांच्या मेळाव्याकडे राजकीय दृष्टीने पाहिले जात आहे. यावेळी हिंदुत्वासह‘भारतीयत्वा’च्या अजेंड्यावर सखोलपणे काम करण्याची चर्चा करण्यात आली.

संघाचं सर्वसमावेशकतेकडं पाऊल...

सरसंघचालक मोहन भागवतां(Mohan Bhagwat)नी एका कार्यक्रमात जातीव्यवस्थेविषयी मोठं वक्तव्य केलं होतं. यामुळे संपूर्ण देशभरात गदारोळ उडाला होता. जात देवानं नाही तर पंडितांनी निर्माण केली. देवानं नेहमीच सांगितलंय की, माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यात कोणतीही जात-वर्ण नाही. पण पंडितांनी वर्गवारी केली, जी चुकीची आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत होतं.

याआधी मुस्लिम समुदायाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत संघानं सर्वसमावेशकतेचं पाऊल उचललं होतं. महिलांना समान संधी, समान दर्जा मिळाला पाहिजे असंही सरसंघचालकांनी म्हटलं.

(Edited By Deepak Kukarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT