Nitin Deshmukh Balapur Akola
Nitin Deshmukh Balapur Akola 
नागपूर

राणे हा भाजपचा पिसाळलेला कुत्रा, आता सेनेच्या आमदाराची जीभ घसरली...

जयेश गावंडे

अकोला : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत ते विवादास्पद वक्तव्य केल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. राणेंची जीभ घसरली आणि आज त्यांना पोलिसांनी अटक केली. आता येथील शिवसेनेच्या एका आमदाराची जीभ घसरली आहे. नारायण राणे हा भारतीय जनता पक्षाचा पिसाळलेला कुत्रा असल्याचे वक्तव्य आमदार नितीन देशमुख यांनी केले आहे. 

नारायण राणे हा भाजपचा वागवलेला पिसाळेल कुत्रा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य अकोल्यातील बाळापुरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अकोल्यात शिवसेनेच्यावतीने आज निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार देशमुख म्हणाले, ज्या पद्धतीने खेड्यापाड्यांत पिसाळलेला कुत्रा असतो, त्याला सर्व गावकरी ठेचतात. तसा हा दिडफुट्या नारायण राणे आहे. त्याची औकात असेल तर त्याने शिवसेनेचे आमदार, शाखाप्रमुख यांना हात लावून दाखवावा, मग त्याचा हात दिसतो का नाही, ते बघावे, अशी अशी संतप्त आणि वादग्रस्त प्रतिक्रिया आमदार नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

नारायण राणेंनी जे केले, ते केले. त्याचे पडसादही महाराष्ट्रभर उमटत आहेत. पण शिवसैनिकांनी संयम बाळगावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे. पण शिवसेनेचे काही नेते भलतेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहेत. आमदार नितीन देशमुख यांनी आज जे वक्तव्य राणेंच्या बाबतीत केले. त्यामुळे हा वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. हा वाद वाढल्यामुळे आंदोलने, मोर्चे काढले जात आहे. मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते आहे. याचे तरी भान शिवसेनेने ठेवावे, अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना सत्तेत आहे, त्यांचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे राज्यात शांतता कायम ठेवण्याची शिवसैनिकांची जबाबदारी आहे, असेही लोक आता बोलू लागले आहेत. 
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT