panchgavya chikitsa may control corona virus
panchgavya chikitsa may control corona virus 
नागपूर

पंचगव्य चिकित्सा वाढवेल रोगप्रतिबंधिकार शक्ती : गो- विज्ञान केंद्राचा दावा

सरकारनामा ब्युरो

नागपूर : जगभरात दहशत पसरविणाऱ्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यात पंचगव्य चिकित्सा पद्धती अत्यंत लाभदायी आहे. गोमुत्र अर्क आणि धुपामुळे विषाणूचा संसर्ग टाळणे शक्‍य आहे. 

नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती, गोविज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, प्रधान वैद्या नंदिनी भोजराज, समन्वयक सुनील मानसिंहका यांनी पत्रकार परिषदेत पंचगव्य औषधांचा कोरोना विषाणूवर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेले सर्वाधिक रूग्ण 65 ते 80 आणि 80 वर्षांच्या वर अशा दोन वयोगटातील आहेत. व्याधिप्रतिकार क्षमता कमी झाल्याने या वयातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूची लागण होत आहे. गोमुत्र अर्क नियमित घेणाऱ्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्याने त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता कमी आहे. गोमुत्रअर्क शरिरातून कफ प्रवृत्ती नष्ट करतो. म्हणजेच कोरोनाची लागण झाली तरी गोमुत्र अर्क लाभदायी ठरणार आहे.

बाधा झालीच तरी विषाणूचा होणारा परिणाम निश्‍चितच कमी राहील.  घरी व परिसरात धुप जाळल्यास कोरोना विषाणूला निश्‍चितच लांब ठेवता येऊ शकते. पंचगव्य घ्रुता सर्वाधिक लाभदायी असल्याचे डॉ. तपन चक्रवर्ती यांनी सांगितले. कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून व्यायाम करा, दररोज एक चमचा गोमुत्र अर्क घ्या, सूर्योदय व सूर्यास्तानंतर कामधेनू धूपबत्ती, धूपन द्रव्य जाळा, शिवाय हळद, काळे मिरे, दालचिनी, तुळशीची पाने, गवती चहाची पाने, अद्रक, मुलेठी उकळून काढा बनवून सेवन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT