गोंदिया : विनयभंगाच्या प्रकरणात तुरुंगामध्ये असलेले तुमसर विधानसभाचे आमदार चरण वाघमारे यांची पालकमंत्री परिणय फुके आणि खासदार सुनील मेंढे यांनी कारागृहामध्ये भेट घेतली.
वाघमारे हे जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांना सांगून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करू असेही परिणय फुके यांनी सांगितले.
आमदार चरण वाघमारे यांच्या जामीन न घेण्याच्या भूमिकेनंतर भंडारा जिल्ह्याचे राजकारण चांगले तापले आहे असून तेली समाजाचे काही नेते आमदार चरण वाघमारे यांच्या पाठीशी उभे राहिले. यामुळे तेली समाज भाजपच्या विरोधात जाऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले.
तुमसर-मोहाड़ी विधानसभा मतदारसंघातील आमदार चरण वाघमारे यांचे तिकिट कापण्यासाठी भाजपमधील काही वाघमारे विरोधकांनी त्यांना या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप त्यांचे समर्थक करू लागले. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांची कानउघाडणी केल्यानंतर फुके हे वाघमारे यांना भेटले.
या भेटीनंतर वाघमारे यांनी जामीन घेण्याची तयारी दाखविली असल्याचे फुके यांनी सांगितले. तसेच या प्रकरणानंतरही तुमसर विधानसभेची उमेदवारी त्यांनाच मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे करू असेही सांगितले.
या सर्व राजकीय डावपेचात संबंधित महिला उपनिरीक्षक यांचे आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल खच्ची होणार नाही याचाही विचार होणार की नाही, हा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.