reservation is obstacle to sarpanch election
reservation is obstacle to sarpanch election 
नागपूर

सरपंचपदाच्या निवडणुकीला आरक्षणाचा खोळंबा

सरकारनामा ब्युरो

अमरावती - सरपंचपदाचे आरक्षण अद्याप निश्‍चित झालेले नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सरपंच पदाची निवड थेट निवडणुकीतून करण्याची सूचना तूर्त प्रसिद्ध करू नये, आयोगाच्या कार्यक्रमानुसारच निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करावी, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे.

एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आयोगाच्या 24 फेब्रुवारीच्या आदेशान्वये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार जिल्ह्यातील 841 पैकी 524 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. 

दरम्यान ग्रामविकास विभागाने 25 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पत्र देऊन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे नामनिर्देशन कोणत्या प्रवर्गासाठी मागवावे, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीची नोटीस जाहीर करणे योग्य होणार नाही. 

शासनाने आरक्षण जाहीर केल्यानंतर नोटीस प्रसिद्ध व नामनिर्देशन स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. संबंधित पत्र निवडणूक विभागातर्फे तहसीलदारांना कार्यवाहीसाठी अग्रेसित करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT