Sarkarnama
Sarkarnama  
नागपूर

शिवसेनेच्या गटनेत्याने उधळली महानगरपालिकेची ऑनलाइन सभा, ८ निलंबित...

मनोज भिवगडे

अकोला : महानगरपालिकेतील संघर्ष थांबण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीये. आज आयोजित ऑनलाइन सभा Online Meeting सोडून शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक महापौरांच्या कक्षात शिरले Shivsena's Group Leader and Corporators Entered in the cabev of Meyor आणि त्यांच्या समोरचा कॅमेरा बंद करून ऑनलाइन सभा उधळून लावली. यावेळी तणावसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. अखेर ८ सदस्यांना एका सभेसाठी निलंबित करण्यात आले. 

मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर व्याज आकारणीच्या मुद्यावरून ऑनलाइन सभा सोडून शिवसेनेच्या सदस्यांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट महापौरांच्या दालनात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी ऑनलाइन सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापौरांनी शिवसेना गटनेत्यांसह आठ नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रहीम पेंटर यांना निलंबित करण्याच आदेश दिला. महानगरपालिकेची सभा सुरू होण्यापूर्वीच हा गोंधळ झाला. 

अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. ही सभा ऑनलाइन असली तरी शिवसेनेच्या सदस्यांनी थेट महापौर व आयुक्त बसलेल्या दानात प्रवेश केला. यापूर्वीच्या सभेत मालमत्ता करावरील व्याज आकारणीला तीन महिन्यांची स्थगिती देण्याचा ठराव घेण्यात आला असताना केवळ एक महिन्याची शास्ती माफ का केली, असा प्रश्न करून शिवसेना गट नेते राजेश मिश्रा यांनी सभा सुरू होण्यापूर्वीच सभेचे कामकाज थांबवून धरले. उपायुक्त वैभव आवारे यांना उत्तर देण्याचा अधिकार नसल्याने प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांना बोलाविण्यात आले. 

एका तासानंतर त्या सभागृहात दाखल झाल्यात. मात्र, शिवसेना गटनेते यांच्यासह सर्व शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात शास्तीच्या विषायावरून सभा सुरू करण्यास विरोध दर्शविला. मात्र, आयुक्त निमा अरोरा या त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने राजेश मिश्रा यांनी महापौर व  आयुक्तांच्या पुढील कॅमेरा बंद केला. परिणामी महापौरांनी राजेश मिश्रा यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांना एका सभेसाठी निलंबित करण्याचा आदेश दिला. शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे रहीम पेंटरही सभागृहात उपस्थित होते. त्यांनाही महापौरांनी निलंबित केले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT