Uddhav Thackeray, Ashish Shelar Sarkarnama
नागपूर

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी ‘आलेपाक'सुद्धा खाणे बंद करावे, आशिष शेलारांचा टोला

Ashish Shelar target Uddhav Thackeray : "पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अद्याप ताज्या असतानाच आशिया कपअंतर्गत भारत विरूद्ध पाकिस्तान मॅच खेळण्यात आली. यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली होती.

Rajesh Charpe

  1. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मॅचला परवानगी दिल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे

  2. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं देखील विरोध दर्शवला असून राज्यभर आंदोलन करण्यात आली आहेत.

  3. तसेच आता भाजपचा निषेध करत शिवसेनेकडून घरोघरी सिंदूरच्या डब्या वाटप केलं जात आहे

Nagpur News : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मॅचला परवानगी दिल्याने विरोधक भाजपवर तुटून पडले आहेत. उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने या विरोधात राज्यभर आंदोलन केलं जातय. सोबतच घरोघरी सिंदूरच्या डब्या वाटप करून निषेध नोंदवण्याचे जाहीर केले आहे. यावरून भाजपचे नेते तसेच राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष शेलार यांनी पाक या शब्दावर उद्धव ठाकरे यांचा आक्षेप असले तर त्यांनी आलेपाकसुद्धा खाणे बंद करावे असा टोला लगावला आहे.

पहेलगाव येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पाकिस्तानचा पाणी पुरवठा देखील बंद करण्याचे जाहीर केले होते. सर्व राजनैतिक संबंध तोडले होते. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासही अनेकांनी विरोध दर्शवला होता.

मात्र यानंतरही भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी दिल्याने भाजपवर सर्वत्र टीका केली जात आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी थेट मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. यावर शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांची कालची टीका अप्रासंगिक होती. जिथे जिथे पाक नाव असेल त्यास ठाकरे यांचा यांचा विरोध असेल तर त्यांनी उद्यापासून आलेपाकसुद्धा खाणे बंद करावे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेली मॅच ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे खेळणे बंधनकारक होते. बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताने खेळू नये, अशी भूमिका भारतवासीयांची नाही. भारतीय पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूरमध्ये आतंकवाद्यांच्या अड्डे उध्वस्त करण्यात आले. हे आपल्या भारतीय सैन्याचे कर्तृत्व आहे. सोबतच क्रिकेट सामना जिंकून भारताने पाकिस्तानला सर्वच क्षेत्रात आपण पराभूत करू शकतो हा संदेश दिला आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादवने हा विजय भारताला अर्पण केला असल्याचे शेलार यांनी सांगितले.

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात ईव्हीएमला विरोध करण्यात आला. सोबतच भाजपवर मतचोरी आरोप करण्यात आला यावर बोलताना शेलार म्हणाले, आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोघेही ईव्हीएमवर निवडून आले आहेत. ईव्हीएमला विरोध असले तर त्यांनी ज्या व्यवस्थेतून निवडून आले त्याचा त्यांनी आधी राजीनामा द्यावा. त्यानंतरच मतचोरीचा आरोप करावा.

सर्वच समाजाला न्याय मिळावा यासाठी महायुती सरकारने कॅबिनेट उपसमित्या नेमल्या आहेत. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे संविधानिक कार्य केले जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी उपसमित्यांवर भाष्य करणे आणि समाजाची वीण बिघडली असे वक्तव्य करणे हेच असंवैधानिक असल्याचेही शेलार म्हणाले.

FAQs :

प्र.1: उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलारांनी काय टीका केली?

उ.1: भाजप नेते शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर उपरोधिक टीका करताना त्यांनी ‘आलेपाक’ खाणंही बंद करावं, असे म्हटलं आहे

प्र.2: भाजप नेते शेलार का भडकले?

उ.2: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मॅचला परवानगी दिल्याने उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. यावरूनच शेलारांनी हे उपहासपूर्ण विधान केले.

प्र.3: याचा राज्यातील राजकारणावर काय परिणाम झाला?

उ.3: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून सोशल मीडियावर याची चर्चा होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT