नागपूर

शिवसेनेचे नागपूर शहरप्रमुख प्रकाश जाधवांविरुद्ध पुन्हा असंतोष उफाळला

सरकारनामा ब्युरो

नागपूर : शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश जाधव यांचा कारभार आणि कार्यशैलीच्या विरोधात पुन्हा असंतोष उफाळून आला असून त्यांना बदलण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. याकरिता लवकरच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांना शिष्टमंडळ भेटणार आहे. 

काल रात्री रविभवन येथे शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीत शहरप्रमुख या नात्याने प्रकाश जाधव शहरात फिरले नाहीत. बैठका घेतल्या नाही. सभांमध्येही सहभागी झाले नाहीत. शिवसैनिकांना नेमके काय करावे याच्याही सूचना दिल्या नाहीत. प्रत्येकाने आपआपल्या पद्धतीने युतीच्या उमेदवाराचे काम केले. 

रामटेकमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते. मात्र त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी होणे व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी करून त्यांचे काम होते. मात्र त्यांनी शिवसेनेच्याही उमेदवाराचे काम केले नाही. संपूर्ण निवडणुकीत त्यांचा एककल्ली कारभार होता. शहरप्रमुख या नात्याने त्यांनी कुठलाच पदाधिकारी व शिवसैनिकांना विश्‍वासात घेतले नाही. अशा प्रमुखांची शिवसेनेला गरज नाही. त्यांच्या विरोधात त्याहीवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या.

असा प्रमुख राहिला तर विधानसभेत शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा येणार नाही. चुकून मिळाली तर शिवसेनेचा उमेदवार निवडूण येणार नाही. त्यामुळे जाधव यांना तातडीने पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

रविभवन येथे झालेल्या बैठकीत शहरप्रमुख, मंगेश कडव, उपजिल्हा प्रमुख सुरज गोजे, विधानसभा प्रमुख राजेश कनोजिया, माजी जिल्हा प्रमुख बंडुभाऊ तागडे, माजी विर्दभ सह संर्पक प्रमुख चंद्रहास राऊत, उप विभाग प्रमुख सुखदेव ढोके, राजु रुईकर, ओंकार पारवे, चंदु दंदे, माजी नगरसेवक बंडु तळवेकर, शरद सरोदे, सोनुसिंग गौर, केतन रेवतकर, हरिभाऊ बनाईत, नरेंद्र मगरे, अरुणपाल सिंग बहल, राजेश गुजर, गुलाब भोयर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT