Randhir Sawarkar Akola 
नागपूर

…म्हणून संतापले आमदार सावरकर, अन् अधिकाऱ्यांना झापले !

पूरपरिस्थितीत जिल्ह्यात नेटवर्कचा खोळंबा होता, टोल फ्री दूरध्वनीवरून शेतकऱ्यांना तक्रारी देता आल्या नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी नुकसानाबाबत लेखी तक्रारी विमा कंपनी, कृषी विभाग, महसूल विभाग यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

अकोला : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण नुकसान भरपाईचा सर्वे करताना शेतकऱ्यांना कमीत कमी मोबदला देता आला पाहिजे. यासाठी पीक विमा कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहेत. यामुळे चिडलेले भाजपचे आमदार रणधीर सावरकर MLA Randhir Sawarkar यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. Slapped other officers. 

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा तातडीने मिळावा, यासाठी राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश कृषी अधिकारी, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले होते. परंतु, नुकसान भरपाई सर्व्हे करताना पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करून शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळेल, असे प्रयत्न केले जात आहेत. पिकांचे उत्पादन संपूर्ण नामशेष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पीक विमा कंपन्यांकडून अशा परिस्थितीत तातडीचा अंतरिम मोबदला (MID SEASON ADVERSITY) शेतकऱ्यांना देण्याबाबत विमा कंपनीसोबत झालेल्या करारनाम्यात तसेच शासकीय नियमित अंतर्भूत आहे, असे यावेळी आमदार सावरकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीपोटी विमा कंपनीकडून तातडीचा अंतरिम मोबदला सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. तसेच मूर्तीजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षाही अधिक घट होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी निरमा अरोरा यांना आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले आहे. आमदार हरीश पिंपळे यांच्या मागणीची दखल घेऊन आता कारवाई केली जाणार आहे. मूर्तिजापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचाही त्यामध्ये तातडीने समावेश करण्यात आला आहे.  

जिल्ह्यात अतिवृष्टीशिवाय सततच्या पर्जन्यामुळे  शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नदी, नाल्यांचा प्रवाह पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी अडचणीचे ठरल्याने पुराच्या पाण्याचे थोपसुद्धा शेतात असल्याने शेतातील पिके सतत पाण्याखाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न होणे शक्य नाही. या परिस्थितीसोबतच पावसाळी हवामानाचासुद्धा पिकांवर मोठा दुष्परिणाम झाला आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. या अतिवृष्टी व पर्जन्यादरम्यान विमा कंपनीचे प्रतिनिधी तक्रार दाखल करण्यासाठी उपलब्ध नव्हते. विमा कंपनीचे पोर्टल बंद होते. 

पूरपरिस्थितीत जिल्ह्यात नेटवर्कचा खोळंबा होता, टोल फ्री दूरध्वनीवरून शेतकऱ्यांना तक्रारी देता आल्या नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी नुकसानाबाबत लेखी तक्रारी विमा कंपनी, कृषी विभाग, महसूल विभाग यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. अमरावती आण अकोला जिल्ह्यातील अनेक नद्यांचा संगम मूर्तीजापूरमध्ये असून येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आणि आमदार सावरकर यांनी दिली. 
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT