Dadaji Bhuse
Dadaji Bhuse 
नागपूर

यावर्षी बियाणे आणि खतांची कमतरता पडणार नाही : दादाजी भुसे

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : मागील वर्षी युरीयाची कमतरता भासली होती. मात्र यावर्षी बियाणे आणि खतांची कमतरता पडणार नाही. शासन स्तरावर दीड लाख मेट्रिक टन युरीया बफर स्टॉक करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याची अमलबजावणीदेखील सुरू झाली आहे, असे कृषिमंत्री दादाजी भुसे आज म्हणाले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार होते. यावेळी कृषिमंत्री भुसे म्हणाले, या दौऱ्यात अनेक अधिकाऱ्यांनी चांगल्या सूचना केल्या आहेत. नागपूर विभागात धान, तूर, सोयाबीन आणि इतरही सर्व पिकांसाठीचे नियोजन झाले आहे. यावर्षी किती बियाणांचा वापर करावा लागेल, याची माहिती शेतकऱ्यांना देण्याचे काम सध्या सुरू आहे. रासायनिक खतांमध्ये १० टक्के बचत कशी करता येईल, याचे प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे यापूर्वी महाबीजच्या माध्यमातून दिले जात होते. आता यावेळी ऑनलाइन अर्ज मागवून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे. 

गेल्या हंगामात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई म्हणून ४.५ ते पाच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना आतापर्यंत दिले आहेत. आता केवळ ४५० ते ५०० कोटी रुपये द्यायचे बाकी आहेत. बियाण्यांची कमतरता यावर्षी जाणार नाही. महाबीजकडे मागील वर्षीचे शिल्लक असलेले सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री केली असली तरी कमतरता जाणार नाही, याचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीपासून कोविडचे संकट राज्यावर घोंघावत आहे. त्यातही राज्य सरकारने योग्य नियोजन करून आर्थिक परिस्थितीवर पकड ठेवलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे दादाजी भुसे म्हणाले. 

बियाण्यांसंदर्भात केंद्र सरकारच्या कायद्यान्वये एसटीबीटीच्या बियाण्यांवर बंदी आहे. राज्यात जेथे कुठे त्याची खरेदी-विक्री करताना कुणी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनीही अशा विक्रेत्यांकडे जाऊ नये, असे आवाहन, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT