Ad._Prakash_Ambedkar
Ad._Prakash_Ambedkar 
नागपूर

वंचित 25 मुस्लिमांना उमेदवारी देणार : प्रकाश आंबेडकर

अरुण जोशी

अमरावती : सर्व वंचित समाजाला सोबत घेऊन ही वंचित आघाडी तयार झाली आहे, त्यामुळे यात सर्वांना न्याय मिळावा यासाठी आता फाटक्या कपड्याची आम्ही जमात तयार केली आहे यात फाटक्या माणसाला सोबत घेऊन सत्ता प्रस्थापित करू असे मत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज दर्यापूर येथे बोलतांना व्यक्त केले. 

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे आज मातंग समाजच्या वतीने समाज प्रबोधन मेळ्याव्याच आयोजन करण्यात आले होते . दर्यापूर नगरीत बाळासाहेब आंबेडकर यांचे ढोल ताश्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले . दर्यापूरतील आजच्या या मेळाव्यास आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आंबेडकर पुढे म्हणाले ,अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात दाखवलेले धाडस आता दाखवले पाहीजे, समाजाने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये श्रद्धेच्या आहारी गेल्याने माणूस गुलाम होतो. एमआयएम आणि आमच्या मधील युती जरी संपुष्टात आली हे जरी खरे असले तरी येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 25 मुस्लिमांना उमेदवारी देणार आहोत . 

लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने वंचितांना मते दिली नव्हती.  वंचितची मते मात्र एम आय एम च्या उमेदवाराला पडली होती याचा त्यांनी पुनरुच्चार केला .  आम आदमी पक्षा सोबत आपल्या पदाधिकाऱयांची बेठक झाली असल्याचे त्यांनी यावेळी प्रसार माध्यमा सोबत बोलताना सांगितले.  

यावेळी मंचावर विदर्भ लहुजी सेनाचे संस्थापक महादेव खंडारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विजय चोरपगार, प्रा.चरणदास निकोसे, साहेबराव वाघपांजर, नंदेश अंबाळकर,  विद्यार्थी सम्यक आंदोलनाचे अंकुश वाघपाजर, जेष्ठ पत्रकार दिलीप एडतकर, वंचित आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख नयन मोंढे  उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT