नागपूर

दक्षिण-पश्‍चिम नागपूरमध्ये इतिहास घडणार - डॉ. आशीष देशमुख

सरकारनामा ब्युरो

नागपूर ः मतदारसंघात जनसंपर्क करीत असताना भाजप सरकारविरोधात जनआक्रोश दिसून येत आहे. महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे यावेळी दक्षिण-पश्‍चिम नागपूर मतदारसंघात इतिहास घडविणार, असे वक्तव्य कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी केले.

सुभाषनगर, अंबाझरी ले-आउट, डागा ले-आउट, गांधीनगर, बजाजनगर, अभ्यंकरनगर, लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी, तकिया, धंतोली या मार्गालगतच्या परिसरात त्यांनी सोमवारी जबरदस्त प्रचार केला. जनसंपर्क दौऱ्यात गृहिणी, छोटे व्यापारी, बेरोजगार युवक-युवती व मजुरांनी त्यांच्याशी चर्चा केली. गृहिणींनी महागाईच्या समस्या विशद केल्या. महागाईमुळे किलोच्या ऐवजी पाव भाजीत भागवावे लागते. सिलिंडर व अन्य जीवनावश्‍यक वस्तू महाग झाल्यामुळे घरचे बजेट या सरकारने बिघडविल्याचे अनेक गृहिणींनी सांगितले. महागाईमुळे धंदा मार खात आहे. कसाबसा उदारनिर्वाह सुरू आहे, असे भाजीविक्रेतेसुद्धा म्हणाले.

हातात असलेले काम जात आहे. त्यामुळे कसेबसे जीवन जगत आहे, असा मजुरांचा सूर होता. बेरोजगारांनी डॉ. आशीष देशमुखांसमोर समस्या मांडल्या. उच्च शिक्षण घ्यायचे आणि नोकरी शोधायला बाहेर फिरायचे. स्थानिक बेरोजगारांना नागपूर परिसरातील एमआयडीसी, मिहान, सेझमध्ये नोकरी का मिळू नये, असा प्रश्‍न विचारून बेरोजगारांनी फडणवीसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. समस्या निवारणाच्या, रोजगाराच्या, नव्या उद्योगधंद्यांच्या व विकासाच्या आश्‍वासनांचे काय झाले, असा प्रश्‍न लोक विचारतील म्हणून फडणवीस इकडे फिरकत नाहीत. फक्‍त श्रीमंतांची कामे होतात. गरिबांना विचारत नाहीत, अशी प्रतिक्रिया जनतेमध्ये प्रचार यात्रेत दिसून आली. डॉ. देशमुख यांनी सायंकाळी दंतेश्‍वरी, धनगरपुरा झोपडपट्टी, ऑरेंज सिटी, खामला येथे पदयात्रा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT