Vijay Vadettiwar Congress
Vijay Vadettiwar Congress 
नागपूर

कुठल्याही परीस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही : विजय वडेट्टीवार

सरकारनामा ब्युरो

नागपूर : कुठल्याही परीस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही, अशी भूमिका कॉंग्रेसची ठरलेली आहे. वरीष्ठ नेत्यांची याबाबत चर्चा सुरु आहे. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. पण त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. येत्या 48 तासाच्या आत चित्र स्पष्ठ होईल, असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे सांगितले.

गेल्या पाच वर्षात भाजपने महाराष्ट्राला खड्ड्यात टाकण्याचे काम केले आहे. जनतेचा दिलेल्या कौलाचाही त्यांनी मान ठेवलेला नाही. त्यामुळे भाजपने पुन्हा सत्तेत येऊ नये, ही कॉंग्रेसच्या सर्व आमदारांसह सर्वसामान्य जनतेचीही ईच्छा असल्याचे ते म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने मिळून सरकार स्थापन केल्यास कॉंग्रेस सोबत जाणार की बाहेरुन पाठींबा देणार या प्रश्‍नाचे उत्तर देताना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची वाट बघावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेला कॉंग्रेसचा पाठींबा पाहीजे असल्यास त्यांना आपल्या विचारसरणीशी तडजोड करावी लागेल. केद्रात असलेल्या मंत्रीपदावरही त्यांना पाणी सोडावेलागेल. त्यानंतरच त्यांच्याशी चर्चा होऊ शकेल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT