BJP Bharati Sonawane Elected Unapposed as Mayor of Jalgaon
BJP Bharati Sonawane Elected Unapposed as Mayor of Jalgaon 
नाशिक

जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध; सेना-एमआयएमने दिला पाठींबा

सरकारनामा ब्युरो

जळगाव :जळगाव महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी शिवसेना, एमआयएम ने त्यांना पाठींबा जाहीर केला.

जळगाव महापालिकेच्या महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या महापौरपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. पीठासिन अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे होते. या पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या एकमेव भारतीय सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना शिवसेना व एमआयएमने पाठींबा जाहिर केला आहे. 

आज पीठासीन अध्यक्ष अविनाश ढाकणे यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यानी फटाके फोडून जल्लोष केला. सौ. भारती सोनवणे गेल्या पाच टर्मपासून नगरसेविका आहेत. त्यांनी यापूर्वी महापालिकेचे उमहापौरपदही भूषविले आहे. त्यांचे पती कैलास सोनवणे नगरसेवक आहेत. त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपदही भूषविले आहे.

जळगाव शहरातील जनतेला स्वच्छता, चांगले रस्ते, तसेच पाणी पुरवठा, तसेच प्राथमिक सुविधा चांगल्या पध्दतीने देण्यासाठी आपला प्रयत्न राहिल - भारती सोनवणे, महापौर, जळगाव
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT