नाशिक

महाजनांवरील टीकेकरून नाशिकमध्ये अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : राज्यात महापुराची परिस्थिती असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन डान्स करतात, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याबद्दल सिडकोतील पवननगर चौकात भाजपकडून माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. 

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरचे 370 कलम हटविल्याने त्याचा जल्लोष करीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ढोल-ताशाच्या गजरात नाच केला होता. याबाबत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात महापुराची परिस्थिती असताना मंत्री डान्स करतात, असे विधान केले होते. 'नाच्या' असाही उल्लेख पवार यांनी केला होता. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या नेतृत्वाखाली पवननगर चौकात कार्यकर्त्यांनी पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी दीपक कुमावत, पांडुरंग पाटील, सुशांत कुंटे, प्रदीप चव्हाण, आनंद अडले, गौरव केदारे, वाल्मिक भवर, संदीप सातभाई, संदीप जाधव आदी उपस्थित होते. 

अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत पुतळा दहन करण्याचे काम नगरसेवक मुकेश शहाणे हे करत असताना दुसरीकडे त्यांच्यासोबत भाजपचे आमदार, नगरसेवक अथवा पदाधिकारी कोणीही दिसून न आल्याने पुतळा दहन कार्यक्रम हा व्यक्तिगत होता की भाजप पक्षाकडून, याबाबत उपस्थित नागरिकांना प्रश्‍न पडला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT