BJP Leader Ekanath Khadase Accepts Challege Given By Girish Mahajan 
नाशिक

...तर पत्रकार परिषद घेऊन पुरावे देईन : एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांना प्रत्युत्तर

गिरीश महाजन यांनी मला जर काही पुरावे असतील तर ते जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. माझ्याकडे पुरावे असून मी ते आधीच पक्षश्रेष्ठींकडे दिले आहेत. आज बैठकीत मला प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ते सर्वांसमक्ष जाहीर करेन, असे प्रत्युत्तर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी माजी मंत्री महाजनांना दिले आहे

संजय महाजन

जळगाव : मी पक्षावर नाराज नाही. मात्र, पक्षांतर्गत कुरघोड्यांबाबत माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. पक्षाने मला परवानगी दिली तर पत्रकार परिषद घेऊन मी ते पुरावे सर्वांसमक्ष जाहीर करेन, असा धक्कादायक गौप्यस्फोट आज भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भाजपची उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. या बैठकीला उपस्थिती दिल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते. खडसेंचे बैठकीस्थानी आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी आपण उशिरा का आलात? याबाबत विचारणा केली. त्यावर उत्तर देताना खडसे म्हणाले, ''मला बैठकीचा साडेतीन वाजताचा निरोप होता. त्यानुसार मी वेळेवर हजर झालो आहे. राहिला विषय नाराजीचा तर मी पक्षावर नाराज नाही. मात्र, गिरीश महाजन यांनी मला जर काही पुरावे असतील तर ते जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. माझ्याकडे पुरावे असून मी ते आधीच पक्षश्रेष्ठींकडे दिले आहेत. आज बैठकीत मला प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ते सर्वांसमक्ष जाहीर करेन," 

पक्षाच्या निर्णयाविरोधात मी जाणार नाही, असेही खडसे शेवटी म्हणाले. दरम्यान, गिरीश महाजन यांनी केलेल्या आव्हानासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रतिक्रियांचे प्रिंट आऊट काढून त्यांचे एक पुस्तक खडसेंनी बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले. या प्रकाराची जोरदार चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT